Kelghar
Kelghar 
सातारा

महाबळेश्वर तापाेळा रस्त्यावर दरड काेसळली; एनएच 4 चे पाणी ओसरले

सिद्धार्थ लाटकर

सातारा : सातारा जिल्ह्यात बुधवारी रात्रीपासून पावसाने (rain) हाहाकार माजवला आहे. मुसळधार पावसामुळे केळघर (kelghar) घाटातून महाबळेश्वरला (mahableshwar) जाणारी वाहतुक दरड काेसळल्याने धिम्या गतीने सुरु हाेती. याबराेबरच महाबळेश्वर तापाेळा (tapola) रस्त्यावर दरड काेसलळ्याने वाहतुक ठप्प झाली हाेती. दरम्यान जिल्ह्यात आज (गुरुवार) सकाळी 10 वाजेपर्यंत सरासरी एकूण 46.8 मिली मीटर पाऊस पडला आहे. आतापर्यंत सरासरी 143.2 मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे अशी माहिती आपत्ती व्यवस्थापनाने दिली. (satara-mahableshwar-tapola-kelghar-nh4-rain-update)

सातारा जिल्ह्यात सकाळी 10 वाजेपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय माहिती आणि कंसात आतापर्यंत झालेल्या एकूण पावसाची आकडेवारी मिलीमीटर मध्ये पुढीलप्रमाणे आहे. सातारा 40 (146.6) , जावळी 80.1 (230.9) , पाटण 82.3 (170.3) , कराड-98.9 (203.7) , कोरेगाव 20.4 (104.4), खटाव15.1 (78.0), माण 4.6 (57.2), फलटण 2.8 (64.1), खंडाळा 6.8 (77.5) , वाई 18.7 (128.4) , महाबळेश्वर 143 (389) मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे.

कोयना धरणाची धरणात आजअखेर 26.54 टीएमसी (26.51टक्के) एवढा पाणीसाठा झाला आहे. कोयना धरण क्षेत्रात 251 मिली मीटर पाऊस (आजपर्यंत एकूण 443 मि.मी) पावसाची नाेंद झाली आहे अशी माहिती धरण व्यवस्थापनाने आज सकाळी दहा वाजता दिली.

दरम्यान कास परिसरातील प्रसिद्ध असलेल्या एकीव धबधब्याचे पाणी ओव्हरप्लो झाल्याने पाणी रस्त्यावर आले. खटाव व परिसरात आज (गुरुवार) पहाटे पासून पावसाने हजेरी लावली असून अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी येत आहेत. शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. गेल्या आठवड्यात बहुतांश शेतकऱ्यांनी पेरण्याची कामे पूर्ण केली होती. मात्र दोन दिवसांपूर्वी अचानक ऊन पडू लागल्याने शेतकरी हवालदिल झाला होता. आज पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा प्रसन्न झाला आहे. करहर ( ता.जावळी) परिसरात रात्री पासून संततधार पाऊस पडत आहे. महाबळेश्वर तापोळा रोडवर वाघेरा या ठिकाणी रस्त्यावर दरड कोसळली. स्थानिकांनी दगड, माती हलवून रस्ता पूर्ववत केला. मायणी भागात पहाटेपासून रिमझिम पाऊस पडत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai local: मुंबईत लोकलच्या गर्दीमुळे झालेला मृत्यू अपघातच! जबाबदारी रेल्वे प्रशासनाची, भरपाई देण्याचे कोर्टाचे आदेश, नाहीतर...

RR vs KKR : राजस्थान अपयशाची मालिका खंडित करणार? अव्वल स्थानावर असलेल्या कोलकताविरुद्ध आज सामना

Vastu Tips: घरात चांदीच्या वस्तू कुठे ठेवाव्या, वाचा वास्तुशास्त्र काय सांगतं?

Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक घटना! लोकलमधून उतरल्यावर तरूणीवर टाकले ज्वलनशील पदार्थ, लॅपटॉप अन् हार केला चोरी

Sharad Pawar: तेव्हा अजित पवार नवखे होते, २००४ साली मुख्यमंत्री पदाची संधी का घालवली? शरद पवारांनी सांगितला माइंड गेम

SCROLL FOR NEXT