सातारा

सोशल डिस्टन्सिंगच्या नियमानुसार दारूची दुकाने सुरू राहू शकतात, तर मंदिरे का नाही?

सकाळ वृत्तसेवा

सातारा : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दळणवळण बंदीमध्ये दारूची दुकाने उघडण्यापेक्षा लोकांच्या श्रद्धा जपण्यासाठी चर्चेस उघडणे अत्यंत आवश्यक असल्याचे विधान नुकतेच केले आहे. तसेच त्यांनी प्रशासनाला तसे निर्देशही दिले. संकटकाळामध्ये 'श्रद्धा' हीच समाजाचा आधार असते. आज समाजाला मद्याची नाही, तर श्रद्धेच्या आधाराची आवश्यकता आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह देश भरातील सर्व दारूंची दुकाने 'सोशल डिस्टन्सिंग'चे नियम पाळून उघडली जाऊ शकत असतील, तर त्याच प्रकारे सर्व नियम पाळून सर्व मंदिरेही तात्काळ खुली केली जावीत, अशी आग्रही मागणी महाराष्ट्रातील समस्त मंदिरांच्या विश्‍वस्तांनी केली.
ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा 

हिंदु जनजागृती समितीच्यावतीने महाराष्ट्रातील मंदिर विश्‍वस्तांचे कृतीशील संघटन निर्माण व्हावे, म्हणून नुकतेच 'ऑनलाईन चर्चासत्र' आयोजित करण्यात आले होते. या चर्चासत्राला राज्यातील 225 मंदिर विश्‍वस्त, मंदिर पुजारी, मठाधिपती, धर्मप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ते तथा संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या वेळी मंदिर सुरु करण्याच्या मागणीचा ठराव करण्यात आला. हा ठराव नुकताच शासनाकडे पाठवण्यात आला आहे. सर्व मंदिरांच्या वतीनेही शासनाला यासंदर्भात पत्रव्यवहार केला जाणार असल्याची माहिती हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट यांनी दिली आहे.

या वेळी मोठ्या मंदिरांनी परिसरातील लहान मंदिरांना साहाय्य करण्यासाठी दत्तक घ्यावे, मंदिरांमध्ये भाविकांना धर्मशिक्षण मिळावे यांसाठी व्यवस्था करावी, मंदिर विश्‍वस्तांचे संघटन होण्यासाठी नियमित बैठकांचे आयोजन करण्यात यावे, असेही ठराव मंदिर विश्‍वस्तांनी एकमुखाने संमत केले. यावेळी सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस , हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी मनाेगत व्यक्त केले. 

CoronaUpdate : खटाव, जावळीत काेराेना बाधितांची संख्या वाढली: खंडाळ्यातील एकाचा सारीने मृत्यु

#MondayMotivation शिशिर ताईगडेचा प्राण तळहातावर घेऊन लढा

रयत शिक्षण संस्थेच्या सचिवपदासाठी 'ही' नावे चर्चेत; 27 जूनला निवड

काॅंग्रेस एकनिष्ठ आमदार भाजपच्या गोटात ? 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Schedule : १४ वन डे, १६ ट्वेंटी-२० अन् ७ कसोटी! IPL 2027 पर्यत टीम इंडियाचं वेळापत्रक; विराट, रोहितच्या फॅनसाठी मेजवानी

FDA: एफडीएचा दणका! IRCTCचे बेस किचन आणि इस्कॉनमध्ये धडक कारवाई, कॅटरर्सचे परवाने थेट निलंबित

तेजश्री प्रधान जर ८० च्या दशकातील हिरोईन असती तर... पाहा झक्कास फोटो, तुम्हीही सहज बनवू शकता

Marathi News Live Updates : पुण्यात एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांने उचलले टोकाचं पाऊल

वीज गेली, मेणबत्तीच्या उजेडात रुग्णावर उपचार करण्याची वेळ; सरकारी रुग्णालयातला धक्कादायक प्रकार, VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT