सातारा

सातारा जिल्ह्यातील या पालिकेने दिली बियाणांसाठी 50 टक्के सूट

सकाळ वृत्तसेवा

मलकापूर (जि.सातारा) ः येथील पालिकेकडून शेतकऱ्यांना भात, भुईमूग व सोयाबीन बियाणांसाठी 50 टक्के अनुदान देण्यात येणार आहे, अशी माहिती उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी दिली. ते म्हणाले,"" पालिकेने नागरिकांसाठी विविध नावीन्यपूर्ण योजना हाती घेऊन त्या यशस्वीरित्या राबविलेल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने 24 तास नळ पाणीपुरवठा योजना, मलकापूर सोलर सिटी, प्रियदर्शनी कन्यारत्न योजना, प्रेमलाताई चव्हाण कन्या सुरक्षा अभियान, महात्मा गांधी दिव्यांग पेन्शन योजना यांचा प्रामुख्याने समावेश असून, या योजनांचा लाभ मलकापूर शहरातील नागरिकांना मिळाल्याने जीवनमान उंचावण्यास मदत झाली आहे.

मलकापूरने लोकसहभागाच्या माध्यमातून सर्व योजना हाती घेऊन राज्यामध्ये एक आदर्श शहर म्हणून नावलौकिक मिळविलेला आहे. शहरातील नागरिकांसाठी विविध योजना राबविल्या आहेत. त्याप्रमाणेच शेतकऱ्यांसाठीही यापूर्वी अनेक योजना हाती घेतल्या आहेत. याकरिता पालिकेने महाराष्ट्रात प्रथमच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्तरावर कृषी विभाग कार्यरत ठेवला आहे. कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना शेतीविषयक अभ्यास दौरे, तज्ज्ञ लोकांकडून मार्गदर्शन, वृक्ष लागवडीअंतर्गत फळबाग लागवड करणे ही कामे केली आहेत. गतवर्षीप्रमाणे यावर्षीही 2020-21 मध्ये मलकापूर शहरातील शेतकऱ्यांना मदत करण्याच्या दृष्टीने भात, भुईमूग व सोयाबीन बियाणे खरेदीसाठी 50 टक्के अनुदान देणार असल्याचे स्थायी समिती सभेचे मंजुरीने जाहीर केले आहे. या योजनेमध्ये मलकापूर शहरामध्ये शेती असणाच्या शेतकऱ्यांना याचा लाभ देण्यात येणार आहे. याकरिता संबंधित शेतकऱ्याने विहित नमुन्यातील अर्ज, शेतीचा सातबारा, बियाणे खरेदी केल्याची मूळ पावती व ज्या बॅंकेमध्ये खाते आहे, त्या बॅंकेचे पासबुकची झेरॉक्‍स अर्जासोबत जोडणे आवश्‍यक आहे.''
 
शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना खरेदी-विक्री संघ अथवा शासकीय मान्यताप्राप्त बियाणे विक्री दुकानातून करावे. अर्ज पालिकेच्या कार्यालयीन वेळेमध्ये पालिकेच्या कृषी विभाग नगरपरिषद बहुउद्देशीय इमारत, लक्ष्मीनगर या ठिकाणी द्यावे. याकरिता रमेश बागल, आरोग्य विभागप्रमुख अब्दुल पटेल, कृषी पर्यवेक्षक यांच्याशी संपर्क साधावा. मलकापूर शहरातील शेतकरी बांधवांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन नगराध्यक्षा नीलम येडगे, उपनगराध्यक्ष शिंदे व मुख्याधिकारी संजीवनी दळवी यांनी केले आहे.

शिवेंद्रसिंहराजे संतापले, सातार्‍यात आधीच अडचणी आहेत त्यात...

खेळाडू, एन.सी.सी, स्काउट गाइडच्या विद्यार्थ्यांसाठी सरकारचा महत्वाचा निर्णय

दहावी नंतर करिअर फक्त कसे निवडावे नव्हेतर कसे घडवावे यासाठी जॉईन करा सकाळ आणि दिशा अकॅडमी, वाई आयोजित वेबिनार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nandigram Bypoll : नंदीग्राम पोटनिवडणुकीआधी मोठी घडामोड; काँग्रेस उमेदवार मिलन प्रधान यांच्यानंतर पक्षातील बड्या नेत्यालाही अटक

Pune University Mess Fee Hike: पुणे विद्यापीठातील मेस दरवाढीचा भार विद्यार्थ्यांवर नको; विद्यापीठाने अनुदान द्यावे: ‘विद्यार्थी संघर्ष कृती समिती’ची मागणी

Chhatrapati Sambhajinagar crime control: दहशत माजवणाऱ्या संदिप फटाकडेला छ. संभाजीनगर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार

Marathi News Live Updates : बुलढाण्यात कंटेनर-दुचाकीचा भीषण अपघात; मायलेकाचा जागीच मृत्यू

Sugarcane Mechanization: ऊसतोड मजुरांच्या मनमानीला कंटाळून शेतकऱ्यांचा यंत्रांकडे मोर्चा; आधुनिक हार्वेस्टरमुळे वेळ व खर्चात बचत

SCROLL FOR NEXT