pune bangloare national highway 
सातारा

पुणे बंगळूर महामार्गावर ट्रक पलटी; वाहतुक सुरळीत सुरु

- प्रशांत गुजर

सायगाव (जि. सातारा) : पुणे बंगळूर महामार्गावर आनेवाड़ी पाटबंधारे वसाहती शेजारी असणाऱ्या पुलावर साखरेची पोती वाहून नेणारा ट्रक टायर फुटून पलटी झाल्याने वाहन चालक अजय क्षीरसागर (वय 23 राहणार - बार्शी) हा जख्मी झाला आहे. या अपघातामुळे काही काळ वाहतुक ठप्प झाली हाेती. सध्या महामार्गावरील वाहतुक सुरळीत सुरु आहे. (satara-marathi-news-accident-pune-bangloare-national-higway-anewadi)

येथील महामार्गावर कोल्हापुरहून गुजरातला साखरेची पोती नेत असलेला ट्रक (MH09 cv6657) पुण्याच्या दिशेने भरधाव वेगाने निघालेला हाेता. हा मालट्रक येथील पाटबंधारे वसाहती शेजारी आल्यानंतर त्याचा टायर फुटूला. त्यामुळे ताे रस्त्याचा दुभाजक फोडून पुणे कडील लेन सोडून सातारा दिशेकडील लेनवर पलटी झाला. सुदैवाने सातारा दिशेने कोणतेही वाहन येत नव्हते त्यामुळे माेठा अनर्थ टळला.

हा अपघात इतका भीषण होता की ट्रकची डीझेल टाकी फुटून त्यामधील डिझेल रत्यावर पसरले होते. त्यामुळे रस्त्यावरुन इतर वाहने जाताना घसरून पडू लागली होती. या अपघाताची माहिती भुईंज पोलिस स्टेशनला समजल्या नंतर आनेवाडी टोल नाक्यावर असणारे वाहतुक पोलिस श्री. पवार व श्री. बोरसे यांनी महामार्गावरील वाहतूक थांबवून सेवा रस्त्याने वाहतूक सुरु केली.

दरम्यान या रस्त्यावर अनेकदा टायर फुटून मोठे गंभीर अपघात घडले आहेत. परंतु रस्ते विकास महामंडळ कोणत्याही प्रकारे या ठिकाणी लक्ष्य देत नसल्याचा आराेप नजकीच्या गावातील ग्रामस्थांचा आहे. त्यात या ठिकाणी पुढील बाजूस कमी लेनचा अरुंद पुल असल्याने भरधाव आलेले वाहन तो पुल पाहुन अचानक ब्रेक लावतात. त्यामुळे देखील अपघात घडत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT