koyna river bomb
koyna river bomb system
सातारा

कोयना नदीपात्रात सापडलेले बॉंब निकामी केले : अजयकुमार बन्सल

अनिल बाबर

तांबवे (जि. सातारा) : येथील कोयना नदीच्या (koyna river) पुलावरून नदीपात्रात मासेमारीसाठी युवकांनी (youth) टाकलेल्या जाळ्यात साेमवारी (ता.17) तीन जिवंत हॅंड ग्रेनेड बॉंब (hand grenade bomb) सापडल्याने खळबळ उडाली. तिन्ही बॉंब सैन्य दलातील आहेत. घटनेमुळे पोलिस दलासह परिसर हादरला आहे. बॉंब शोधक (bomb detection section) व नाशक पथकासह जिल्हा दहशतवाद विरोधी पथकाने घटनास्थळी भेट दिली. दिवसभर तेथे कसून तपासणी केली आहे. पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल (ajayumkar bansal) यांनी सायंकाळी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर बॉंब निकामी करण्यात आले. (satara marathi news bomb ajaykumar bansal koyna-river)

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तांबवे येथील कोयना नदीवर नवीन व जुना असे दोन पूल आहेत. त्यातील जुन्या पुलावरून साकुर्डीचे संभाजी चव्हाण, अरुण मदने व योगेश जाधव मासेमारी करत होते. त्यांनी पुलावरून नदीपात्रात त्यांचे जाळे व गळही टाकला होता. नेहमीप्रमाणे तिघेही मासेमारीसाठी बसले होते. जाळे टाकल्यानंतर काही वेळाने त्यांच्या जाळ्याला ओढ लागली. त्यांना मासा अडकला आहे, असे वाटले. त्यांनी गळ ओढला. प्रत्यक्षात माशाऐवजी गळाला प्लॅस्टिकची पिशवी लागली. त्यांनी ती नदीतून बाहेर काढली. पिशवीला गाठ मारून ती टाकली होती.

उत्सुकतेपोटी युवकांनी पिशवीची गाठ सोडून ती उघडली. त्या वेळी त्यात बॉंबसदृश वस्तू दिसल्या. तिघांनाही संशय आल्याने त्यांनी त्याची माहिती तालुका पोलिस ठाण्यातील गुन्हे शाखेचे हवालदार अमित पवार, शशिकांत काळे व सज्जन जगताप यांना दिली. बॉंबची माहिती मिळताच पोलिस तेथे पोचले. त्यांनी पाहणी केली. पिशवीत तीन हॅंड ग्रेनेड दिसले. त्यांनाही धक्काच बसला. त्यांनी खात्री केल्यानंतर त्याची माहिती वरिष्ठांना दिली.

पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे, जिल्हा परिषदेचे सदस्य प्रदीप पाटील तेथे पोचले. उपअधीक्षक रणजित पाटील तेथे काही वेळाने आले. त्यापूर्वीच तेथे जिल्हा दहशतवाद विरोधी पथकासह बॉंब शोधक व नाशक पथक आले होते. दोन्ही पथकाने बॉंबची तपासणी केली. सैन्य दलाकडून हॅंड ग्रेनेड बॉंब असल्याची खात्री पटली. पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनीही सायंकाळी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर ते तिन्ही बॉंब निकामी करण्यात आले.

बॉंब शोधक पथकाकडून कोयना नदीच्या तांबवे येथील पुलाखाली सापडलेल्या जिवंत तीन हॅंड ग्रेनेड बॉंबची कसून तपासणी केली आहे. तिन्ही बॉंब धोकादायक होते. ते निकामी करण्यात आले. तिन्ही बॉंब शस्त्रास्त्र निर्मितीच्या फॅक्‍टरीतील आहेत. ते बॉंब नदीपात्रात कसे आले त्याचे आश्‍चर्य असले, तरी त्याचा सखोल तपास करणार आहोत.

अजयकुमार बन्सल, पोलिस अधीक्षक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT