leopard  
सातारा

सावधान! विंगला बिबट्याने मांडलय ठाण; कळपातील कोकरावर हल्ला

विलास खबाले

विंग (सातारा) : विंगसह परिसरात बिबट्याचा मुक्काम कायम मंगळवारी प्रत्यक्ष बिबट्याचे दर्शन झाले. येथील कानिफनाथ मंदिर परिसरात शेतातील बांधावर ग्रामस्थांना तो दिसला. त्याची छबी कॅमेराबध्द झाली आहे. सायंकाळी एका शेळीच्या कळपातील कोकरावर त्याने हल्लाही केला. शेतकऱ्यांनी वेळीच त्यास धुडकावले. (satara-marathi-news-leopard-in-ving-village)

विंगसह विविध परिसरात बिबट्याने अक्षरशः दहशत निर्माण केली आहे. सुतारकी वस्ती, कणसे मळा, मसोबा माळ आदी परिसरात त्याचा वावर नित्याचाच बनला आहे. वारंवार पाळीव प्राण्यांवर लक्ष्य करून हल्ला चढवत आहे. हल्ल्याचे सत्र अद्याप सुरूच आहे. काल येथील कानिफनाथ मंदिर परिसरात प्रत्यक्ष त्याचे दर्शन झाले. एका शेताकडेला बांधावर येथील हंबीरराव शिंदे व त्याच्या कुटुंबीयांना तो दिसला. त्याची छबी त्यांनी कॅमेराबध्द केली.

दरम्यान, सायंकाळी शेळीच्या कळपातील एका कोकरावर हल्ला त्याने चढवला. सुतारकी परिसरात घटना घडली. मात्र, शेतकऱ्यांनी वेळीच त्यास धुडकावले. कैलास खबाले यांची शेळी मात्र बचावली. तत्पूर्वी, त्याच परिसरात शेळीच्या कळपावर दिवसाढवळ्या हल्ला केला आहे. तेही बिबट्याच्या‍ जोडीने. अनेकदा त्या परिसरात शेतकऱ्यांनी त्यास पाहिल्याचे सांगितले. त्यामुळे बिबट्याचा मुक्काम त्या परिसरात कायम असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. तेथूनच तो पाळीव प्राण्यांना लक्ष्य करून हल्ले चढवत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

SCROLL FOR NEXT