mseb system
सातारा

चार दिवसांच्या परिश्रमानंतर वीजेसह पाणीपुरवठा झाला सुरळीत

वीजपुरवठा एक दोन दिवसांत सुरू होईल ,या अपेक्षेने प्राधिकरणाने पाणी पुरविण्यासाठी काही प्रयत्न केले नाही.

अभिजीत खूरासणे

महाबळेश्वर (जि. सातारा) : वीजपुरवठा खंडित (power resume) झाल्याने महाबळेश्वर (mahableshwar) शहरात निर्माण झालेली कृत्रिम पाणीटंचाई (water scarcity) चौथ्या दिवशी संपुष्टात आली. चार दिवसांच्या प्रतीक्षेनंतर महाबळेश्वर व पाचगणी (mahableshwar panchgani) येथे वीज व पाणीपुरवठा सुरळीत झाला आहे. satara marathi news power resume mahableshwar panchgani tautkae cyclone

वादळामुळे वीज वितरण कंपनीचे कंबरडे मोडले होते. अनेक ठिकाणी विजेचे खांब पडले होते, तर विजेच्या ताराही तुटल्या होत्या. यामुळे वीजपुरवठ्यामध्ये मोठा अडथळा निर्माण झाला होता. शनिवारपासून शहराचा वीजपुरवठा बंद पडला होता. महाबळेश्वर व पाचगणी शहरास जीवन प्राधिकरणाच्या वतीने पिण्याचे पाणी पुरविले जाते. वीजपुरवठा खंडित झाल्याने या दोन्ही शहरांचा पाणीपुरवठा बंद पडला होता. वीजपुरवठा एक दोन दिवसांत सुरू होईल ,या अपेक्षेने प्राधिकरणाने पाणी पुरविण्यासाठी काही प्रयत्न केले नाही.

नगराध्यक्ष व नगरसेवकांनी शहरातील कृत्रिम पाणीटंचाईची साधी दखलही न घेतल्याने नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात होता. दरम्यान, पाणीटंचाईमुळे शहरातील नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरू झाली. तीन दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी शहर पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी पुढाकार घेण्याचा निर्णय घेतला.

एकीकडे त्यांनी नागरिकांना आवश्‍यकतेनुसार पाण्याचे टॅंकर पुरविण्यास प्रारंभ केला. पालिकेच्या टॅंकरबरोबर खासगी टॅंकरही त्यांनी भाड्याने घेऊन पाणी पुरविण्यास सुरुवात केली. दुसरीकडे त्यांनी शहर पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी दोन जनरेटर मागविले. मुख्याधिकाऱ्यांनी सुरू केलेल्या प्रयत्नांना उपनगराध्यक्ष अफजल सुतार व नगरसेवकांनी सहकार्य केल्याने बुधवारपासून शहराचा पाणीपुरवठा सुरळीत झाला. दरम्यान शहरात मंगळवारी रात्री वीजपुरवठा देखील सुरू झाला. पाचगणीतही महावितरणने बुधवारपर्यंत युद्धपातळीवर काम करुन शहराचा विद्युत पूरवठा सुरु केला. चार दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शहराचा वीज व पाणीपुरवठा सुरळीत झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russian Woman Nina Kutina: गोकर्ण जंगलाच्या गुहेत सापडलेली रशियन महिला ८ वर्ष स्वयंपाक कशी करायची? मुलींना काय खायला द्यायची?

'26 निष्पापांच्या हत्यांमागे पाकिस्तानचा हात, त्या दहशतवाद्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करणार'; जम्मूच्या उपराज्यपालांचा कडक इशारा

Walking 10000 Steps: दररोज 10,000 पावले चालल्यास काय होईल? डॉक्टरांनी सांगितले शरीरात दिसणारे 5 बदल

Gokul Milk Politics : आप्पा महाडिकांनी थेट मुश्रीफांनाच घेतलं अंगावर, कारभार चांगला, मग ‘टोकण’ कशासाठी?

Nagpur Crime: कर्जदाराचे अपहरण, जिवे मारण्याची धमकी; सावकारासह चौघांना अटक

SCROLL FOR NEXT