vaccination File photo
सातारा

लसीकरणाअभावी 400 युवकांच्या नोकरी, शिक्षणाची झालीय अडचण

हेमंत पवार

कऱ्हाड (जि. सातारा) : परदेशात (foreign) उच्च शिक्षण (higher education) घ्यायचे, परदेशी नोकरी (job in foreign) करायची या इराद्याने जिल्ह्यातील तरुणांनी (youths) ऑनलाइन नोंदणी करून तेथील प्रवेश, नोकरी निश्‍चित केली आहे. मात्र, सध्या राज्यात 18 ते 44 वर्षांखालील कोविड लसीकरण (coronavirus vaccination) बंद आहे. त्यातच विदेशी दूतांनी (foreign delegation) लसीकरणाशिवाय परदेशात इंट्रीच नाही, असा फतवा काढला आहे. त्याचा फटका जिल्ह्यातील 300 ते 400 परदेशी जाणाऱ्या तरुणांना बसला आहे. वेळ जाण्याअगोदर निर्णय न झाल्यास संबंधित तरुणांच्या परदेशी जाऊन शिक्षण घेण्याच्या, नोकरी करण्याच्या आशेवर पाणी फिरणार आहे. (satara-marathi-news-students-demands-vaccination-foreign-shrinivas-patil)

भारतीयांनी परदेशातील अनेक देशांत आपल्या ज्ञानाने कर्तृत्व सिद्ध केले आहे. अमेरिका, जर्मनसारख्या देशात भारतीयच उच्च पदावर कार्यरत आहेत. त्याचबरोबर परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या तरुण- तरुणींचीही संख्याही जास्त आहे. त्यांनी उच्च शिक्षणासाठी आपली ऑनलाइन नोंदणी केली आहे. त्याचबरोबर काही तरुण- तरुणींनीही नोकरीसाठीही ऑनलाइन नोंदणी केली आहे. त्यांना परदेशी येण्यासाठी सांगण्यात आले आहे. मात्र, त्यांना कोविड लसीकरणाची अट घालण्यात आली आहे. ती लस जागतिक आरोग्य संघटनेची मान्यता असलेली कोव्हिशिल्डच घेतलेली असावी, अशीही अट आहे.

त्यातच राज्यात सध्या 18 ते 44 वर्षांतील लसीकरण बंद करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधितांच्या लसीकरणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तरुण- तरुणींना ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये परदेशी जावे लागणार आहे. त्यांना सध्या लस मिळाली नाही, तर त्यांना परदेशी जाता येणार नाही. त्याचा प्रशासनाने विचार करून विद्यार्थ्यांच्या संधीची वेळ दवडण्याअगोदर इलाज करण्याची गरज आहे अन्यथा विद्यार्थ्यांच्या स्वप्नावरच पाणी फिरणार आहे.

परत जाणऱ्यांचीही गैरसोय

जिल्ह्यातील अनेक जण सध्या नोकरी, शिक्षणासाठी परदेशी आहेत. दोन- तीन महिन्यांपूर्वी ते भारतात परत आले आहेत. त्यांना आता परत जायचे आहे. मात्र, अनेकांचे लसीकरणच झालेले नाही. त्यामुळे त्यांनाही परदेशी जाता येत नाही. त्यामुळे त्यांचीही अडचण झाली आहे.

उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणार आहे. मात्र, कोविड लसीकरणाची अट आहे. त्याचबरोबर जागतिक आरोग्य संघटनेची मान्यता असलेली कोव्हिशिल्ड लसच घेतलेली पाहिजे, असाही नियम आहे. त्यासाठी तातडीने प्रयत्न होण्यासाठी खासदार श्रीनिवास पाटील यांच्याशी संपर्क साधला आहे असे मेढा येथील विद्यार्थी आदित्य काशीळकर याने सांगितले.

लसीकरणाअभावी सातारा जिल्ह्यातील सुमारे 300 ते 400 तरुणांच्या परदेशी जाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यासंदर्भात तरुणांनी माझ्याशी संपर्क साधला आहे. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याशी त्या प्रश्नासंदर्भात मार्ग काढण्याची सूचना केली आहे असे खासदार श्रीनिवास पाटील यांनी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND W vs PAK W : भारताचा पाकिस्तानला धुळ चारत सर्वात मोठा विजय! दिप्ती शर्माचा विकेट्सचा पंजा, तर श्री चरणीही चमकली

TMC Split: पश्चिम बंगालच्या राजकारणात भूकंप! टीएमसीचे बंडखोर खासदार दुसऱ्या पक्षात विलीन होणार; NDA ला पाठिंबा देणार

Poet Honoured: रुबाईकार रमेश वैद्य यांना काव्यरसिकचा जीवनगौरव; ‘खरे कवी आणि सच्चे माणूस’ असा हिमांशू कुलकर्णींचा गौरवोद्गार

Manchar Crime : मंचरमध्ये तरुणीला कालव्यात ढकलण्याची धक्कादायक घटना; आरोपी तरुण अटकेत, एनडीआरएफकडून तीव्र शोधमोहीम

Shreeram Gaikwad Death Case: श्रीराम गायकवाड संशयास्पद मृत्यू प्रकरणी निष्पक्ष चौकशीची मागणी; देवगाव रंगारीत कुटुंबीय व भिल्ल समाजाचे आमरण उपोषण

SCROLL FOR NEXT