Accident Accident
सातारा

मायणीजवळील अपघातात लातूरचा युवक जागीच ठार; मानमोडी शाेकसागरात

संजय जगताप

मायणी (जि. सातारा) : येथून पंढरपूरकडे जाणाऱ्या राज्य महामार्गावर देशमुख वस्तीनजीक (विखळे, ता. खटाव) रविवारी कार व दुचाकीचा समोरासमोर अपघात झाला. त्यामध्ये दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला, तर चौघे जखमी झाले असून त्यांच्यावर साताऱ्यात उपचार सुरू आहेत. (satara-marathi-news-two-died-in-road-accident-mayni-latur)

सूरज राजाराम माळी (वय २७, रा. मायणी (मानमोडी), ता. खटाव) व संतोष किसनराव बिराजदार (वय ४०, रा. सय्यदपूर, ता. देवणी, जि. लातूर) अशी मृतांची नावे आहेत. राजकुमार बिराजदार (वय २५), ज्योतिराम धनाजी बिराजदार (वय ३५), दत्ता बिराजदार (वय ३२), महेश विठ्ठल झोळकुडे (वय २४) (सर्वजण रा. सय्यदपूर, ता. देवणी, जि. लातूर) असे चार तरुण गंभीर जखमी झाले. सर्व जखमींना उपचारासाठी सातारा येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची नोंद मायणी पोलिसात झाली आहे.

याबाबत घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी : मल्हारपेठ-पंढरपूर राज्य महामार्गावर येथून पंढरपूरकडे जाताना सुमारे सात किलोमीटर अंतरावर देशमुखवस्ती आहे. त्या वस्तीनजीक दुपारी चारच्या दरम्यान अपघात झाला.

दुचाकीस्वार हे दुचाकीवरून (क्र. एमएच ११ सीएफ ८५१९) मायणीकडे येत होते, तर कार (क्र. एमएच १४ जीयू ६७९८) पंढरपूरच्या दिशेने निघाली होती. देशमुख वस्तीनजीक छोट्याशा वळणावर दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली. त्यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर चारचाकी गाडीतील अन्य चार जण गंभीर जखमी झाले.

या अपघातात वाहनांचेही मोठे नुकसान झाले. लातूरकडे निघालेले तरुण जोतिबा (कोल्हापूर) दर्शनासाठी गेले होते. दरम्यान, अपघाताचा मोठा आवाज येताच परिसरातील वस्त्यांवरील रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेत अपघाग्रस्तांना मदत केली. पोलिसांनाही कळविले. जखमींना पुढील उपचारासाठी सातारा येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chamoli Tunnel Collapse: अचानक स्फोटाचा आवाज, काही क्षणांत टनल बनली ‘मृत्यूचा सापळा’; 7 जणांचा मृत्यू, वाचलेल्यांनी सांगितला थरार

MD Smuggling: एमडी तस्करीसाठी दुबईतून फंडिंग; जरीपटका येथील मुख्य आरोपीविरोधात ‘लुक आऊट’ नोटीस

Maharashtra River Linking: मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा! महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी नदीजोड प्रकल्प; याच वर्षी काम सुरू होणार

Marathi News Live Updates : वीर धरणातून 5,737 क्युसेक पाण्याचा विसर्ग नीरा नदीपात्रात सुरू

Kolhapur Baby Death : दूध पाजताना काळजी घ्या! अवघ्या 31 दिवसांच्या बाळाचा ठसका लागून दुर्दैवी अंत; कोल्हापुरातील काळीज पिळवटून टाकणारी घटना

SCROLL FOR NEXT