Satara ZP Building 
सातारा

मृत कर्मचाऱ्यांच्या वारसदारांना जिल्हा परिषदेत नोकरी

प्रशांत घाडगे

सातारा : जिल्हा परिषदेत कार्यरत असताना कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्‍या वारसांच्या नोकरीचा मार्ग मोकळा झाला आहे. या काळात मृत झालेल्या कर्मचाऱ्यांच्‍या कुटुंबीयांतील वारसदाराने सज्ञान झाल्यानंतर एक वर्षाच्या आत अर्ज करणे बंधनकारक असून, त्यानंतर अनुकंपा तत्त्वातून त्याला नोकरी मिळेल. (satara-marathi-news-zilla-parishad-assures-job-relative-covid19-death),

कोरोनाच्या काळात जिल्हा परिषदेतील कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करत आहेत. त्यामुळे आतापर्यंत जिल्हा परिषदेतील विविध विभागातील २४ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामधील पाच कर्मचाऱ्यांना ५० लाखांचा विमा मिळाला असून, उर्वरित प्रस्ताव राज्य शासनास पाठविले आहेत. तसेच, मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना नोकरी देण्यासाठी राज्य शासनाने योजना लागू केली आहे. त्यामध्ये कोरोनात मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्‍या कुटुंबीयांनी अनुकंपावरील नियुक्तीच्या योजनेची माहिती, पात्र नातेवाईक, अर्ज करण्याची मुदत, शैक्षणिक आर्हता, टंकलेखन प्रमाणपत्र सादर करणे आवश्‍यक आहे.

दरम्यान, कोरोनात मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांचे पात्र वारसदार सज्ञान नसल्यास अर्ज करता येत नाही. ते वारसदार सज्ञान झाल्यानंतर एका वर्षाच्या मुदतीत अर्ज करणे आवश्‍यक आहे. त्यामध्येही कुटुंब निवृत्तीवेतनधारकाला कुटुंब निवृत्तीवेतनविषयक कागदपत्रांची पूर्तता करताना लेखी कळविणे संबंधित आस्थापना अधिकाऱ्याला बंधनकारक आहे. दरम्यान, जोपर्यंत अनुकंपा नियुक्तीकरिता आवश्‍यक कागदपत्रे उमेदवारांकडून प्राप्त होत नाहीत, तोपर्यंत वारसदारांचे नाव समाविष्ट करता येत नसल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाने सांगितले आहे.

अनुकंपा तत्त्वावर नियुक्तीसाठी कागदपत्रांची पूर्तता करताना बराच कालावधी जात असून, वारसांनी कागदपत्रांची जुळणी करताना दक्षता घेण्याची आवश्‍यकता आहे. अनुकंपातून उमेदवारांनी नोकरीसाठी अर्ज मुदतीत देणे आवश्‍यक आहे अशी माहिती मनोज जाधव (उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सातारा) यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT