Satara 
सातारा

विवाहबंधनासोबत "त्यांनी' गुंफले पर्यावरणाशीही बंध

सकाळ वृत्तसेवा

मल्हारपेठ (जि. सातारा) : नवविवाहित जोडप्याने लग्नानंतर मंदिराच्या आवारात वृक्षारोपण केले. त्यामुळे विवाहबंधनासोबत त्यांनी पर्यावरणाशीही बंध गुंफले, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. 

निसर्गाची समृध्दी व्हावी म्हणून नवदांपत्याने केलेले वृक्षारोपण हे या क्षेत्रात कौतुकाचा विषय ठरला आहे. ठोमसे येथील नवदांपत्याने वृक्षारोपण केले. तेथील मंदिर जीर्णोद्धार समितीच्या वतीने 200 रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले आहे. संचारबंदीच्या काळामध्ये ग्रामस्थांनी एकत्र येऊन मंदिराचे सुशोभीकरण केले आहे. ठोमसे येथे दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे तालुका सरचिटणीस अमोल व तेथील सुप्रिया यांचा तांबेवाडी येथे विवाह झाला. साध्या पद्धतीने विवाह सोहळा पार पडला. विवाह होताच हे नवदांपत्य ग्रामदैवत श्री शंभूराज देवाच्या दर्शनास गेले. तेथे मंदिर जीर्णोद्धार समितीतर्फे वृक्षारोपण सुरू होते. त्या नवदांपत्याने तेथे वृक्षारोपणही केले. वृक्षलागवड करून वनसंवर्धन व पर्यावरणाच्या समतोलासाठीचे अभियान राबविले. सोबत वऱ्हाडी मंडळींनीही झाडे लावण्यासाठी परिश्रम घेतले. 


""विवाहबंधनासोबत पर्यावरणाचे संगोपन व संवर्धन करण्याचाही संदेश सर्वांना मिळावा म्हणून आम्ही वृक्षारोपण केले. यापुढेही लग्नाच्या प्रत्येक वाढदिवसानिमित्त गावातील सार्वजनिक ठिकाणी वृक्षलागवड करण्यासाठी पुढाकार घेणार आहोत. त्या माध्यमातून शासनाच्या उपक्रमास हातभार लावू.'' 

-अमोल माने, 
ठोमसे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sachin Tendulkar: जीवनाचं चक्र पूर्ण...! सचिनचा लॉर्ड्सवर ENG vs IND कसोटीदरम्यान अनोखा सन्मान; पाहा फोटो

Vasmat Accident : ऑटो व बसची समोरासमोर धडक; दोन महिलांचा मृत्यू, एका महिलेची प्रकृती गंभीर

Latest Maharashtra News Updates : यूपी आर्थिक गुन्हे शाखेकडून गुरनाम सिंगला अटक

Mumbai Goa Highway: रस्त्यांना तडे अन् जागोजागी खड्डे, मुंबई-गोवा महामार्गाची दयनीय अवस्था, ठाकरे गटाकडून पोलखोल

Nashik News : कामगार मोर्च्यामुळे स्मार्ट रोडवर वाहतूक कोंडी; पर्यायी मार्गही फसले

SCROLL FOR NEXT