Satara 
सातारा

दूध दरवाढीसाठी विठ्ठल प्रतिमेला दुग्धाभिषेक, राष्ट्रीय समाज पक्षातर्फे अनोखे आंदोलन

सकाळ वृत्तसेवा

दहिवडी (जि. सातारा) : दुधाला लिटरला 35 रुपये भाव मिळावा, या मागणीसाठी राष्ट्रीय समाज पक्षातर्फे येथील तहसील कार्यालयासमोर विठ्ठलाच्या प्रतिमेला दुधाचा अभिषेक करून आंदोलन करण्यात आले. 

"रासप'चे माण-खटाव विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष प्रा. सचिन होनमाने व रासपचे कायदे सल्लागार विलास चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांच्या दुधाला लिटरला 35 रुपये भाव मिळावा. प्रतिलिटर पाच रुपये अनुदान हे थेट शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा व्हावे. गाभण/दुधाळ जनावरांना विमा देण्यात यावा. दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना विशेष बजेट देण्यात यावे, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. 

कोरोनाच्या काळात सर्व घटकांसोबत शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून, या नुकसानीची भरपाई मिळावी म्हणून राष्ट्रीय समाज पक्ष रस्त्यावर उतरला आहे. महादेव जानकर मंत्री होते, तेव्हा त्यांनी 22 रुपयांवर असलेला दुधाचा दर 35 रुपयांपर्यंत नेला होता. त्यामुळे गावगाड्यातील शेतकऱ्याला ताकद मिळाली होती. दूध उत्पादक शेतकरी आनंदी झाला होता. पण, या राज्यात पुन्हा दुधाचा दर घसरला आहे, असे प्रा. होनमाने म्हणाले. विठ्ठलाने सरकारला सुबुद्धी द्यावी, अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली. 

यावेळी सुनील वाघमोडे, दादा माळवदे, दत्ता खांडेकर, दादासाहेब वीरकर, शिवाजी गलंडे, संदीप होनमाने, तुषार खाडे, आनंद दोलताडे, भारत राखुडे, विजय महानवर, सचिन वाघमोडे, नितीन काळे व पदाधिकारी उपस्थित होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shiv sena Pune Election: पुण्यात शिवसेनेची युती तुटली? १२३ जागांवर पक्ष स्वतंत्र लढणार? पडद्यामागे काय घडलं?

Sangli Election : ‘माघार घे, तुला कॉप्ट करतो! ’महापालिका निवडणुकीत नेत्यांचे नवे गाजर; सांगलीत ‘स्वीकृत’ राजकारण चर्चेत

Latest Marathi News Live Update : दिल्ली हत्याकांड: लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली जबाबदारी, पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित

धक्कादायक! नववर्षानिमित्त मिठाई देण्यासाठी घरी बोलावलं अन् प्रेयसीनं चाकूनं प्रियकराचं गुप्तांगच कापलं, मुंबईत काय घडलं?

Jaipur Tourism: पर्यटकांच्या खिशाला लागणार कात्री! जयपूरच्या ऐतिहासिक स्थळांचे तिकीट झाले दुप्पट; जाणून घ्या नवीन शुल्क

SCROLL FOR NEXT