man 
सातारा

हे मंत्री म्हणाले... पोलिसांचे मनोधैर्य खचू देणार नाही

रुपेश कदम

दहिवडी (जि. सातारा) : लॉकडाउन काळात पोलिसांचे मनोधैर्य खचणार नाही, याची दक्षता गृह राज्यमंत्री म्हणून मी घेतोय, असे सांगतानाच प्रशासनाचे माण तालुक्‍यात समाधानकारक काम असल्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले. 

येथील फलटण चौकातील पोलिस नाकाबंदीची पाहणी केल्यानंतर तहसील कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे, पोलिस उपअधीक्षक बी. बी. महामुनी, तहसीलदार बी. एस. माने, दहिवडीचे सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार भुजबळ, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव, उपजिल्हाप्रमुख संजय भोसले, तालुका प्रमुख बाळासाहेब मुलाणी उपस्थित होते. देसाई म्हणाले, ""माण तालुक्‍यात कोरोना बाधितांचे प्रमाण कमी आहे. फक्त नऊ ठिकाणी कंटेनमेंट झोन आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधांचा पुरेसा साठा असून, दररोज 50 च्या आसपास रुग्ण येत आहेत. कोरोना सेंटरवर चांगल्या सुविधा पुरवल्या जात आहेत. लॉकडाउन जनतेने स्वीकारला आहे. वादावादी न होता दहिवडी व म्हसवड येथे लॉकडाउन यशस्वी झाला आहे. या संसर्गापासून सर्वसामान्य जनतेच्या बचावासाठी ज्या उपाययोजना कराव्या लागतील त्या करताना निधी कमी पडणार नाही.'' 

म्हसवड येथे पोलिसांवर दमदाटी केल्या प्रकरणातील नगरसेवकावर कारवाई करण्यात येईल. बिनजोड बैलगाडी शर्यती व त्यावर लागणाऱ्या सट्ट्याबद्दल माहिती द्या, नाव गोपनीय ठेऊन संबंधितांवर कारवाई करू, अशी हमी त्यांनी दिली. शिंगणापूरवरून नातेपुतेला जाणाऱ्या घाटात रस्ता बंद केला असल्याने अडचण निर्माण होत असल्याचे लक्षात आणून देताच अडवलेला रस्ता खुला करून वैद्यकीय कारणासाठी परवानगी देण्याची सूचना देसाई यांनी केली. दहिवडी येथे पोलिस विभागाच्या अडीच एकर जागेत इमारतीसंबंधी लवकरच निर्णय घेऊ, पोलिस उपअधीक्षक कार्यालय दहिवडीत होण्यासंदर्भात लॉकडाउन संपल्यानंतर चर्चा करू, असेही त्यांनी सांगितले. 
 

(संपादन ः संजय साळुंखे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Success Story: मित्रांची साथ ठरली निर्णायक… सर्व रूममेट बनले अधिकारी… सुरज पडवळ यांची राज्य सेवेत क्लास-वन पदावर निवड

Latest Marathi News Live Update : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील घेणार डॉक्टर महिला कुटुंबीयांची भेट

Kolhapur Politics : कोल्हापूर महापालिकेत नकारात्मक काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना पालकमंत्र्यांनी घेतलं चांगलचं फैलावर, आयुक्तांनाही सुनावत आबिटकर म्हणाले...

'पुन्हा शिवाजीराजे भोसले' चित्रपटाने पहिल्या दिवशी किती केली कमाई? तब्बल इतक्या कोटींचं आहे बजेट

श्रीमंतीचा दिखावा की कलाकृतीचा संदेश? शुद्ध सोन्यापासून घडवलेल्या 'टॉयलेट'ची जगात चर्चा, ट्रम्प यांना देऊ केले होते Toilet; किती किंमत?

SCROLL FOR NEXT