patan 
सातारा

दिवशी बुद्रुकला दानशूरांकडून 16 विद्यार्थ्यांना मोबाईल

राजेश पाटील

ढेबेवाडी (जि. सातारा) ः सध्याच्या कोरोना स्थितीमुळे शाळा- महाविद्यालये बंद असल्याने ऑनलाइन शिक्षणाची प्रक्रिया राबविली जात आहे. मात्र, ग्रामीण व दुर्गम भागातील सर्वच विद्यार्थ्यांच्या घरी अँड्रॉइड मोबाईल नसल्याने त्यांच्यासमोर अडचणी आहेत. ही गैरसोय ओळखून दिवशी बुद्रुक (ता. पाटण) ग्रामस्थांनी एकत्र येत गावातील माध्यमिक विद्यालयातील 16 विद्यार्थ्यांना स्वखर्चाने मोबाईल भेट देऊन ज्ञानगंगा अखंड प्रवाहित ठेवली. 

कोरोनाच्या फैलावामुळे शाळा बंद असल्याने विद्यार्थी घरीच आहेत. ऑनलाइन शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षण दिले जात आहे, तरीही ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांच्या घरांमध्ये अँड्रॉइड मोबाईल नसल्याने त्यांच्यासमोर अडचणी उभ्या राहात आहेत. दिवशी बुद्रुक येथे गांधी टेकडी येथील ठक्करबाप्पा विद्यालयाची भागशाळा आहे. या शाळेतील काही विद्यार्थी मोबाईलअभावी ऑनलाइन शिक्षणापासून वंचित राहात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर तेथील शिवाजी ढवळे, श्रीरंग कुंभार, वसंतराव पाटील, शरद सूर्यवंशी, प्रदीप सूर्यवंशी, शामराव कुंभार, किसन कुंभार, तुकाराम थोरात, अरुण सावंत, बबन सूर्यवंशी, भिकाजी पवार, विजय कारंडे, मारुती कांबळे या दानशूरांनी पुढे येत 16 विद्यार्थ्यांना मोबाईल दिले. ही दानशूर मंडळी उच्चशिक्षित असून, त्यांनी प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत पायपीट करून शिक्षण घेतले आहे. 

मोबाईल वितरण कार्यक्रमास शिवाजी ढवळे, प्राचार्य डी. जे. नांगरे, सरपंच संजय थोरात, आबासाहेब पाटील, जे. बी. सूर्यवंशी, डी. सी. पाटणकर, विष्णू सूर्यवंशी, एम. ए. साळुंखे, चंद्रकांत सूर्यवंशी, गंगाराम कुंभार, शैलेश कुंभार, प्रदीप थोरात, भिकाजी पवार आदी उपस्थित होते. ग्रामस्थांच्या या दातृत्वाचे परिसरातून कौतुक होत आहे. 

संपादन ः संजय साळुंखे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

धर्मांतर कायद्यानंतर आता UCC! महाराष्ट्रात समान नागरी संहिता लागू करणार? विवाह, वारसा, घटस्फोट नियमांमध्ये होणार बदल

Ashok Kharat: ''अजित पवारांच्या निवासस्थानाबाहेर घडलेला प्रकार गंभीर...'', आमदाराचं मुख्यमंत्र्यांना पत्र

अमरावतीत स्वच्छतेचा बोजवारा; कंत्राटदार नियुक्तीच्या प्रक्रियेला खीळ; सत्ताधाऱ्यांसह विरोधकांच्या तलवारी म्यान

Latest Marathi News Live Update: डोंबिवली येथे सिग्नल यंत्रणेत बिघाड

Aadul News : रमजान ईदवर अवकाळी पावसाचे सावट; आडूळ परिसरात पिकांचे मोठे नुकसान

SCROLL FOR NEXT