सातारा

राज्यातील नाट्यगृहे, ग्रंथालये खूली करा : उदयनराजे

सकाळ वृत्तसेवा

सातारा : राज्यातील ज्येष्ठ कलाकारांना शासनाकडून विविध श्रेणीनुसार मानधन दिले जाते. कोरोनामुळे गेल्या तीन ते चार महिन्यांपासून मानधन वितरित केलेले नाही. त्याचे त्वरित वितरण करावे व भविष्यात मानधन नियमित मिळावे. राज्यातील नाट्यगहे, ग्रंथालये पुरेशी सुरक्षा घेऊन सुरू करावीत. लोक कलाकारांना ही शासनाने भरीव मदत करावी, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या वाचा
 
यासंदर्भात उदयनराजे भोसले यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले, की शासन ज्येष्ठ कलाकारांना त्यांच्या पात्रता श्रेणीनुसार ठराविक मानधन देत आहे. तथापि कोविड-19 संसर्गजन्य रोगाच्या पार्श्‍वभूमीवर संबंधित कलाकारांचे मानधन मिळालेले नाही. हे थकलेले मानधन सर्व संबंधितांना एकरकमी देण्यात यावे, अशी मागणी मुख्यमंत्री ठाकरे यांना एका विशेष पत्राद्वारे केली आहे, तसेच राज्यातील नाट्यगृहे, ग्रंथालये ही तीन महिन्यांपासून बंद आहेत. त्यामुळे नाट्य कलाकारांवर, तसेच नाट्य कंपनीवर अवलंबून असलेल्या सर्वांवर उपासमारीची वेळ आली आहे.

शासनाने चित्रपट व मालिकांना चित्रीकरणाची परवानगी दिली आहे. नाटकांचे प्रयोग आणि ग्रंथालये सुरू करण्यास परवानगी देणेबाबत निर्णय घ्यावा, असे निवेदनात म्हटले आहे.

गंभीर रुग्णांना इथं आणताय... मग हे नक्की वाचा

लॉकडाउनमध्ये मधुमेहींच्या नेत्रपटलावर दुष्परिणाम, अंधत्वाच्या प्रमाणातही वाढ, तज्ञ डॉक्‍टरांचा निष्कर्ष

दीड लाख सातारकर स्वगृही दाखल; कोरोना विषाणू संसर्गाचा वाढला प्रसार; प्रशासनासह नागरिकांचीही वाढली चिंता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब लवकर हवी? आता आधीच टिप देण्याचा खेळ संपला! सरकारचा Uber-Ola ला मोठा आदेश

Gelatin Blast: पुण्यातल्या कामगाराचं भयंकर कृत्य! कमरेला स्फोटकं बांधून सासरवाडीत पोहोचला, एक बटण दाबलं अन् सगळं संपलं

Onion Rate : मंचर बाजार समितीत कांद्याला दहा किलोस मिळाला ४११ रुपये उच्चांकी बाजार भाव

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, तीन जणांचा मृत्यू, काही जखमी

Pune News : प्रशासनातील वाद चव्हाट्यावर! वरिष्ठ अधिकारी दुजाभाव करतात; महापालिका आयुक्तांकडे तक्रार

SCROLL FOR NEXT