सातारा

पुढच्या वर्षी लवकर या! बाप्पांच्या विसर्जनासाठी सातारा पालिकेची नियमावली वाचा

प्रवीण जाधव

सातारा : गणेश विसर्जनासाठी पालिकेची तयारी पूर्ण झाली असून, शहरातील विविध परिसरांमध्ये तीन कृत्रिम तळ्यांसह पाण्याचे कुंड तयार करण्यात आले आहेत. नियमांचे पालन करून गणेश भक्तांनी मूर्तींचे विसर्जन करण्याचे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. विशेष म्हणजे विसर्जनासाठी केवळ दोघांनाच जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.
 
कोरोना संसर्गामुळे दरवर्षीप्रमाणे गणेशोत्सवाचा डामडौल दिसत नाही. संसर्ग टाळण्यासाठी शासनाने विविध निर्बंध घातले होते. त्यामुळे मूर्तींच्या उंचीसह देखाव्यावरही परिणाम झाला आहे. अनेक मंडळांनी स्वत:हून मंडळात मूर्ती न स्थापन करण्याचा निर्णय घेतला. तरीही घरगुती गणपतींबरोबरच व बहुतांश मंडळांतही लहान गणेशमूर्तींची प्रतिस्थापना झालेली आहे. संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी शक्‍यतो घरातच विसर्जन करण्याचे आवाहन केले जात आहे. तरीही ज्यांना शक्‍य नसेल त्यांच्या मूर्तींच्या विसर्जनासाठी पालिकेने तयारी पूर्ण केली आहे.

पुण्यातील एकासह साताऱ्यातील वकीलावर गुन्हा; निघाले हाेते महाबळेश्वरच विकायला 
 
शहरामध्ये मूर्तींच्या विसर्जनासाठी तीन कृत्रिम तलाव तयार करण्यात आले आहेत. तसेच फुटका तलाव, मंगळवार तळे, गोखले हौद, पंताचा गोट, रामाचा गोट, विश्‍वेश्‍वर मंदिर, न्यू इंग्लिश स्कूल चौक तसेच करिअप्पा चौक, सदरबझार या ठिकाणी जलकुंड ठेवण्यात आली आहेत. घरामध्ये विसर्जन न करणाऱ्यांनी या ठिकाणीच मूर्तींचे विसर्जन करावयाचे आहे.

रामराजेंच्या सूचनांची गृहमंत्र्यांकडून दखल

कृत्रिम तळ्यांवर विसर्जनासाठी सकाळी सात ते सायंकाळी सात अशी कालमर्यादा निश्‍चित करण्यात आली आहे. त्याबरोबर विसर्जनासाठी जाताना गर्दी टाळण्यासाठी घरातील दोन सदस्यांनीच जाण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. विसर्जनस्थळी आरती करण्यासही यंदा परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांना घरातून निघण्यापूर्वीच विसर्जनाची आरती करावी लागणार आहे.

Video : कोरोनासह जलप्रदूषण टाळण्यासाठी घरच्या घरीच असे करा 'श्रीं'चे विसर्जन 

त्याचबरोबर विसर्जनाच्या ठिकाणी मास्क घालणे व शारीरिक अंतराचे पालन करणे बंधनकारक करण्यात येणार आहे. त्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. बुधवार नाक्‍यावर सार्वजनिक मंडळांच्या गणेशमूर्ती विसर्जनासाठी दरवर्षीप्रमाणे मोठे कृत्रिम तळे तयार करण्यात आले आहे. या ठिकाणी 31 ऑगस्ट व एक सप्टेंबर या दिवशी सार्वजनिक मंडळांच्या मूर्तींचे विसर्जन होणार आहे.

साताऱ्यात 50 कोटींचे जंबो हॉस्पिटल!, मुख्यमंत्र्यासह लोकप्रतिनिधींची भूमिका ठरणार महत्वाची

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT