satara muncipality sakal media
सातारा

स्‍थायीसमोर दिवसागणिक वाढताहेत विषय; आतापर्यंत ३०० विषयांचं संकलन

गत निवडणुकीत थेट नगराध्‍यक्षपदाच्‍या उमेदवारासह सातारा पालिकेची सत्ता एकहाती ताब्‍यात घेण्‍यात सातारा विकास आघाडीला यश आले होते

अक्षय साबळे

सातारा : पालिकेच्‍या कार्यकारिणीची मुदत संपण्‍यास तीन आठवडे बाकी असून, या कालावधीत शहरातील विकासकामांना चालना देण्‍यासाठी स्‍थायी समितीच्‍या सभेचे आयोजन करण्‍याची गडबड पालिकेत सुरू आहे. स्‍थायीच्‍या सभेत मांडण्‍यासाठी सद्य:‍स्‍थितीत ३०० च्‍या आसपास विषयांचे संकलन झाले असून, दिवसगणिक या विषयांत वाढ होत आहे. विषयांची जुळवाजुळव सुरू असली तरी स्‍थायीची सभा कोणत्‍या तारखेस आयोजित करायची, याबाबत ठोस माहिती पालिका प्रशासनाकडून मिळू शकली नाही.

गत निवडणुकीत थेट नगराध्‍यक्षपदाच्‍या उमेदवारासह सातारा पालिकेची सत्ता एकहाती ताब्‍यात घेण्‍यात सातारा विकास आघाडीला यश आले होते. पालिकेच्‍या सभागृहात निर्विवाद वर्चस्‍व सिध्‍द करत सातारा विकास आघाडीने अनेक ठिकाणी, विषयांत नगर विकास आघाडीची कोंडी केली. सभागृहातील कोंडी फोडत स्‍वतंत्र असित्व, वर्चस्‍व सिध्‍द करण्‍याचे कोणतेही प्रयत्‍न गेल्‍या पाच वर्षांत नगर विकास आघाडीने केले नसल्‍याचे दिसून येत आहे. नगर विकास आघाडीकडून प्रभावी विरोध होत नसल्‍याने, सक्षम विरोधकाची भूमिका ते बजावत नसल्‍याने सातारा विकास आघाडीने पालिकेचा कारभार एकहाती सुसाट दामटवला आहे. पालिकेच्‍या कार्यकारिणीचा कार्यकाळ येत्‍या २२ डिसेंबरला संपत आहे. कार्यकाळ संपण्‍यास फक्‍त तीन आठवडे बाकी असून, आगामी निवडणुकीत मतदारांना आपल्‍याकडे पुन्‍हा एकदा खेचण्‍यासाठीची बेरीज-वजाबाकी ‘साविआ’कडून सध्‍या पालिकेत सुरू आहे.

याच अनुषंगाने पालिका प्रशासन सध्‍या स्‍थायी समितीच्‍या तयारीत गुंतले आहे. ‍सद्य:स्‍थितीत शहरासह शाहूपुरी, विलासपूर, दरे बुद्रुक, पिरवाडीसह इतर वाढीव भागातील विकासकामांना चालना देण्‍यासाठीच्‍या विषयांचे संकलन सुरू आहे. आत्तापर्यंत ३०० हून अधिक विषय स्‍थायी समितीच्या सभेपुढे मांडण्‍यासाठी संकलित करण्‍यात आले असून, त्‍यात दिवसागणिक वाढ होत आहे. येत्‍या काही दिवसांत स्‍थायीसमोरील विषयांची संख्‍या ४०० च्‍या घरात पोचण्‍याची शक्‍यता पालिकेचे अधिकारी, कर्मचारी वर्तवत आहेत.

‘‘कोरोना, लॉकडाउन व इतर कारणांमुळे प्रशासकीय कामकाजावर मर्यादा आल्‍या होत्‍या. मर्यादा असूनही विकासकामांना गती देण्‍याचा प्रामाणिक प्रयत्‍न सातारा विकास आघाडीने पालिकेच्‍या माध्‍यमातून केला आहे. ‍सद्य:स्‍थितीत स्‍थायी समितीच्‍या सभेचे आयोजन करण्‍यात येत असून, त्‍यासाठीच्‍या विषयांचे संकलन सुरू आहे. हे संकलन झाल्‍यानंतर अजेंडा कायम करून आठ दिवसांत सभा घेण्‍यात येईल.’’

-मनोज शेंडे, उपाध्‍यक्ष, सातारा पालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

मध्यपूर्वेत तणाव वाढला, पुन्हा युद्धाला सुरुवात! अमेरिकेकडून १४० हून अधिक ठिकाणांवर हल्ले, इराणचंही प्रत्युत्तर...

INDW vs ENGW Test: जे सचिन, विराटला नाही जमलं, ते पोरीनं करून दाखवलं! यास्तिका भाटीयाने लॉर्ड्स कसोटीत इतिहास घडवला

Ashadhi Wari Accident Aid: आषाढी वारीतील अपघाती मृत्यू प्रकरणी चंद्रपूरच्या वारकऱ्याच्या वारसांना ४ लाखांची मदत; विठ्ठल रखुमाई वारकरी योजना २०२५ अंतर्गत मंजुरी

Latest Marathi News Update: सटाण्यात रोटरी क्लबचा पदग्रहण सोहळा उत्साहात

SCROLL FOR NEXT