सातारा

...म्हणून आमदार महेश शिंदेंची काेरेगावला खास 'भेट'

सकाळ वृत्तसेवा

कोरेगाव (जि.सातारा) : विधानसभेच्या निवडणुकीत कोरेगाव शहराने दिलेले मोठे योगदान व त्यामुळे मिळालेला विजय लक्षात घेऊन आमदार महेश शिंदे यांनी पहिल्याच प्रयत्नात शहरातील अंतर्गत रस्ते आणि भुयारी गटार योजनेचे काम मार्गी लावले आहे. त्यासाठी शासनाने मंजूर केलेल्या तब्बल सात कोटींच्या निधीतून नगरपंचायतीमार्फत अत्याधुनिक पध्दतीने ही कामे केली जाणार असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक राजाभाऊ बर्गे यांनी दिली.
 
विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान उमेदवार म्हणून महेश शिंदे यांनी संपूर्ण शहर पायी पालथे घातले होते, असे नमूद करून श्री. बर्गे यांनी सांगितले, की नागरिकांनी केलेल्या मागणीनुसार अंतर्गत रस्ते आणि भुयारी गटार योजनेचे काम हाती घेण्याचे श्री. शिंदे यांनी त्याचवेळी निश्‍चित केले होते. शांतीनगरमध्ये अंतर्गत रस्ते नसल्याने नागरिकांची गैरसोय होत होती. पावसाळ्यामध्ये या भागात पायी चालणेदेखील मुश्‍किल होत होते. देसाई पेट्रोल पंपाच्या मागील कन्याशाळा परिसरातील नागरिकांचेही पावसाळ्यात पाण्यामुळे हाल होत होते. शांतीनगर, जुन्या पेठेलगतचा श्रीश्रीनगर परिसर (अरुण बर्गे घर) आणि सुभाषनगरमधील भगवा चौक परिसरातील रस्त्यांची दुरवस्था झाली होती. गटारे नसल्याने पाण्याच्या निचऱ्याअभावी नागरिकांच्या त्रासात भर पडत असल्याचे श्री. शिंदे यांच्या निदर्शनास आले होते. त्यामुळे आमदार झाल्यानंतर त्यांनी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे व गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून कोरेगावातील अंतर्गत रस्ते आणि भुयारी गटार योजनेसाठी सुमारे सात कोटींचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता.

या कामांना नगरविकास विभागाचे अवर सचिव विवेक कुंभार यांनी 18 जून रोजीच्या पत्रान्वये मंजुरी दिली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार शिंदे यांनी भैरवनाथ मंदिर, कन्याशाळा परिसर, सुभाषनगर, लक्ष्मीनगर परिसरातील नागरिक, व्यापारी व कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन या कामांबाबतची माहिती दिल्याचे श्री. बर्गे यांनी सांगितले. 

...म्हणून मी उपमुख्यमंत्र्यांना भेटणार : आमदार शशिकांत शिंदे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT