सातारा

राष्ट्रवादीतर्फे दहा जूनला रक्तदान शिबिर; युवकांना नोकरीसाठी नोंदणीचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा

सातारा : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष येत्या दहा जूनला 21 वा वर्धापनदिन साजरा करीत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व खासदार सुप्रिया सुळे यांच्या सूचनेनुसार यानिमित्त जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी दिली.
 
यामध्ये जिल्ह्यातील तालुक्‍यांच्या ठिकाणी रक्तदान शिबिर होतील. पक्षाच्या विविध सेलच्या माध्यमातून राष्ट्रवादी कार्यालय येथे 10 जूनला सकाळी दहा वाजता रक्तदान शिबिर व राष्ट्रवादी ऑनलाइन नोकरी महोत्सव होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत हे शिबिर होणार आहे. पक्षाचे सर्व सेलचे प्रमुख, कार्यकर्ते, तसेच जनतेने रक्तदानात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष माने यांनी केले आहे. या वेळी विधान परिषद सभापती रामराजे निंबाळकर, खासदार श्रनिवास पाटील, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, जिल्हा प्रभारी आमदार शशिकांत शिंदे, मकरंद पाटील, दीपक चव्हाण, प्रभाकर घार्गे, सत्यजित पाटणकर, दीपक पवार, प्रभाकर देशमुख उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने वर्धापनदिनानिमित्त "ऑनलाइन नोकरी महोत्सव'अंतर्गत बेरोजगार युवक- युवतींना रोजगार संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. गरजू बेरोजगार युवक- युवतींनी पुढे यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

इच्छुक बेरोजगार युवकांनी खाली दिलेल्या गुगल ड्राइव्हच्या https://forms.gle/xikubng6MBGTpPgp8 लिंकवर क्‍लिक करून नावनोंदणी करावी, असे आवाहन युवकचे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे यांनी केले आहे.

दमदार कामगिरी : 56 गुन्ह्यांतील फरार आराेपी पाेलिसांच्या पाठलागानंतर जेरबंद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: IMDचा मोठा इशारा! मुंबईसह 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट; पुढील २ दिवस कसे असेल हवामान?

Raksha Bandhan 2026: रक्षाबंधन कधी आहे? राखी बांधण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या मुहूर्त आणि संपूर्ण माहिती

Bhiwandi Building Collapse : भिवंडी इमारत दुर्घटनेत आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू; बालकासह आणखी तिघे ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

Latest Marathi News Live Update : अंबाबाई मंदिर संवर्धनातील त्रुटींबाबत म्हणणे मांडा; पुरातत्त्‍व विभागाला कारणे दाखवा नोटीस

Koyna Dam Water Release : कोयना धरणाचे 6 वक्र दरवाजे उघडले! मोसमातील पहिलाच विसर्ग; धरणात 86.11 टीएमसी साठा, 25 हजार क्युसेकने पाण्याची आवक

SCROLL FOR NEXT