सातारा

कऱ्हाड तालुक्‍यातील 17 ग्रामपंचायती बिनविरोध; जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींत दुरंगी लढत

हेमंत पवार

कऱ्हाड (जि. सातारा) : तालुक्‍यातील 104 ग्रामपंचायतींपैकी 17 ग्रामपंचायती बिनविरोध, तर 30 ग्रामपंचायती अंशतः बिनविरोध झाल्याचे काल अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी स्पष्ट झाले. दरम्यान, एकूण 1024 जागांपैकी 246 उमेदवार बिनविरोध झाले आहेत, तर 778 जागांसाठी 1662 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. 

तालुक्‍यातील मोठ्या ग्रामपंचायतीसह 104 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता. त्यापैकी अर्ज दाखल माघारीच्या शेवटच्या दिवशी निवडणुकीच्या रणधुमाळीचे चित्र स्पष्ट झाले. त्यामध्ये तालुक्‍यातील उंडाळे या मोठ्या ग्रामपंचायतीसह कामथी, किरपे, येणके, संजयनगर, वाघेश्वर, लटकेवाडी, म्हारुगडेवाडी, टाळगाव, भुरभुशी, अंबवडे, खोडजाईवाडी, पाचुंद, गोटे, वसंतगड, हणबरवाडी, विरवडे या 17 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. 

तर तालुक्‍यातील हजारमाची, शहापूर, म्हासोली, गमेवाडी, भोळेवाडी, शेवाळवाडी-म्हासोली, सवादे, शेवाळवाडी-उंडाळे, घोगाव, शिवडे, भवानवाडी, हरपळवाडी, आबईचीवाडी, वारुंजी, भरेवाडी, काले, खुबी, शेळकेवाडी-म्हासोली, खराडे, चौगुलेमळा, गोळेश्वर, वाठार, कोळे, बामणवाडी, आकाईचीवाडी, भुयाचीवाडी, वाघेरी, गोवारे, कोडोली, नांदलापूर या 30 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित बहुतांश ग्रामपंचायतीमध्ये दुरंगी, तर काही ग्रामपंचायतीमध्ये तिरंगी लढत होणार आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH Live Score: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT