सातारा : जिल्ह्यात विविध रुग्णालय, कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या 176 नागरिकांना आज सायंकाळपर्यंत घरी सोडण्यात आले असून 386 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
386 जणांचे नमुने तपासणीला : स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 3, कराड येथील 9, फलटण येथील 10, कोरेगाव येथील 4, वाई येथील 21, खंडाळा 7, रायगाव येथील 57, पानमळेवाडी येथील 106, महाबळेश्वर येथील 19, पाटण 14, खावली येथील 15, तळमावले 6, म्हसवड येथील 25, तरडगांव येथील 9, व कृष्णा मेडीकल कॉलेज कराड येथील 54 असे एकूण 386 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले असल्याची माहिती डॉ. चव्हाण यांनी दिली.
घेतलेले एकूण नमुने : 260687
एकूण बाधित : 53083
घरी सोडण्यात आलेले : 50089
मृत्यू : 1753
उपचारार्थ रुग्ण : 1241
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.