Satara Latest Marathi News 
सातारा

पुण्यात खोदकामात सापडली 1835 च्या काळातील सोन्याची नाणी; 216 नाण्यांनी उजळली साताऱ्याची तिजोरी

गिरीश चव्हाण

सातारा : पुण्याच्या पिंपरी चिंचवड परिसरातील चिखली येथे सहा महिन्यांपूर्वी घराचा पाया खोदताना सापडलेल्या सोन्याच्या 216 नाण्यांवर मजुरांनी डल्ला मारला होता. वाटणीच्या वादातून सुरु झालेली सोन्याच्या नाण्यांची कुजबुज कानावर आल्यानंतर ती नाणी पोलिसांनी जप्त केली. ही जप्त नाणी सातारा येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाच्या खजिन्यात जमा झाली असून त्याच्या लखलखाटामुळे सर्वांचे डोळे विस्फारत आहेत. 

चिखली परिसरात सहा महिन्यांपूर्वी घराच्या बांधकामासाठी पाया खोदण्याचे काम सुरु होते. जेसीबीने खोदकाम सुरु असतानाच जमिनीतून खळखळ आवाज आला. आवाजामुळे खोदकाम करणाऱ्या मजुरांचे कान टवकारले गेले. इतरांच्या नजरा चुकवत दोन मजुरांनी आवाजाच्या ठिकाणी शोध घेतला. यावेळी त्यांना तांब्याच्या धातूचा मोठा गडवा सापडला. जेसीबीचा दात लागून फुटलेल्या तांब्याच्या गडव्यात सोन्याची नाणी होती. आजूबाजूला कोणी नसल्याचे पाहून त्या दोघांनी सोन्याच्या नाण्यांचा गडवा लांबवला. 

तुम्हाला माहितीय? 15 व्या शतकातील चीनी कलाकृतीच्या Porcelain Bowl ची किंमत $500,000 डॉलर्स इतकी आहे!

यात सोन्याची तब्बल 216 नाणी होती. सहा महिन्यानंतर त्या दोघांच्यात वाटणीचा वाद झाला. या वादाची कुजबुज कानावर पडल्याने पोलिसांनी त्या दोघांना ताब्यात घेत सोन्याची 216 ऐतिहासिक नाणी जप्त केली. ही नाणी पुणे येथील पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतली. पडताळणीनंतर ती येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तु संग्रहालयाच्या खजिन्यात जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानुसार ती नाणी नुकतीच पुरातत्व संचालक तेजस गर्गे,सहाय्यक संचाक विपीन वाहने यांनी संग्रहालयाचे अभिरक्षक प्रवीण शिंदे यांच्याकडे सुपूर्द केली. यावेळी गणेश पवार, अजीत पवार, विनोद मतकर, कुमार पवार, भांबळ आदी उपस्थित होते. 

स्वीडनमध्ये 1300 वर्षांपूर्वीच्या रहस्यमय गोष्टीचा शोध; Gold Foil मध्ये दिसली मिठी मारणारी जोडपी

नाण्यांचे वजन 2 किलो तीनशे ग्रॅम
 
खोदकामादरम्यान सापडलेली नाणी पोलिसांनी जप्त केली असून त्याचे वजन सुमारे 2 किलो 357 ग्रॅम इतके आहे. या सोन्याची किंमत बाजारभावानुसार दिड कोटीच्या घरात आहे. ही नाणी सुमारे सन 1835 ते 1889 या कालावधीतील सिराज उद्दीन महमंद शहा बहाद्दुर दुसरा याच्या राजवटीतील असण्याचा अंदाज आहे. 

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs IRE 2nd T20I : शिवम दुबेच्या दोन चेंडूंनी सामना फिरवला, प्रिंस यादवने पदार्पणाचा सामना गाजवला; आयर्लंडला स्वस्तात रोखले

जगप्रसिद्ध आयफेल टॉवरवर कोसळली वीज, थरारक दृष्य कॅमेरात कैद; पाहा VIDEO

Maharashtra Sugar: माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड माळेगाव साखर कारखान्याच्या मार्गदर्शनाची धुरा सांभाळणार

ओमराजे आता गद्दारीचा शिक्का कसा पुसणार? धाराशीवच्या सभेत उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली, काय म्हणाले?

ZIM vs BAN 1st Test: २७ धावांत ८ विकेट्स... बांगलादेशची दुबळ्या झिम्बाब्वेसमोर शरणागती; Newman Nyamhuri ने वाट लावली Video

SCROLL FOR NEXT