सातारा

कऱ्हाडला वर्षात 2.16 कोटी दंडाची वसुली; पोलिसांकडून एक लाख दोन हजार वाहनांवर कारवाई

सचिन शिंदे

कऱ्हाड (जि. सातारा) : शहर पोलिस ठाण्याच्या वाहतूक शाखेने 2020 या वर्षात दोन कोटी 15 लाख 52 हजार 600 रुपये दंडाची वसुली केली आहे. महिन्याकाठी पोलिसांनी 18 लाखांची वेगवेगळ्या कलमांन्वये कारवाई केली आहे. वर्षभरात पोलिसांनी एक लाख दोन हजार 716 वाहनांवर कारवाई केली आहे. मार्च ते सप्टेंबरअखेर लॉकडाउन काळामध्ये सर्वाधिक 28 लाख 39 हजार 600 रुपयांच्या दंडाची वसुली केली आहे. विनाकारण फिरणाऱ्या तब्बल पाच हजार दुचाकीही पोलिसांनी लॉकडाउनच्या काळात जप्त केल्या होत्या. त्यांच्याकडूनही मोठ्या प्रमाणात दंडाची वसुली करण्यात आली.

जानेवारीपासून सप्टेंबरपर्यंत एक कोटी 56 लाख आठ हजार 700 इतक्‍या दंडाची वसुली केली आहे. सप्टेंबरपासून डिसेंबरअखेर तब्बल 60लाख 43 हजार 900 रुपयांचा दंड शासकीय तिजोरीत जमा केला. लॉकडाउनच्या काळात पोलिसांनी तब्बल 11 हजार 299 नागरिकांवरील कारवाईतून 28 लाख 39 हजार 600 रुपयांच्या दंडाची वसुली केली. त्यामध्ये विनामास्क, सोशल डिस्टन्स आदींच्या एक हजार 661 नागरिकांवर कारवाई झाली. त्यातून आठ लाख 34 हजारांचा दंड वसूल केला. वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या नऊ हजार 638 नागरिकांवर कारवाई केली. त्यातून 20 लाख 51 हजार 100 रुपयांच्या दंडाची वसुली झाली आहे. वाहतूक पोलिसांनी मागील वर्षी 2019 मध्ये डिसेंबरअखेर 80 लाख 59 हजार दंड वसुली केली होती. यंदा मात्र तोच दंडाचा आकडा दोन कोटींहून अधिक पार पाडला आहे, हाही एक विक्रमच आहे. मागील वर्षी कारवाई झालेल्या वाहनांची संख्या कमीच होती. यंदा एक लाखाहून अधिक वाहनांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. 
 

...असा आला दंड 

  • वाहन चालविणाऱ्या अल्पवयीन मुलांच्या 44 पालकांना 22 हजारांचा दंड 
  • वाहन परवाना न दाखविणाऱ्या 30 हजार 261 जणांना 60 लाख 52 हजारांचा दंड 
  • विनापरवाना वाहन चालवणाऱ्या 1761 जणांकडून आठ लाख 80 हजार दंड 
  • सिग्नल तोडणाऱ्या 1792 जणांकडून तीन लाख 58 हजार दंड 
  • हायवेवरील लेनचा नियम तोडणाऱ्या 237 जणांकडून 50 हजार दंड 
  • पोलिसांच्या सूचना न पाळणाऱ्या 506 कारवाईतून 2.50 लाख दंड 
  • न्यायालयात 300 खटले पाठवले 
  • दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या 63 जणांवर खटले 
  • रहदारीस अडथळा करणाऱ्या 256 जणांवर कारवाई 
  • महामार्गावर चुकीच्या पद्धतीने वाहन चालवणाऱ्या 32 जणांवर कारवाई 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Chaturthi 2026 Wishes in Marathi: "गजानना श्री गणराया..." गणेश चतुर्थीनिमित्त प्रियजनांना पाठवा गणेशभक्तीने ओथंबलेल्या खास मराठी शुभेच्छा

टीम इंडियाने नक्वींकडून आशिया कपची ट्रॉफी का घेतली नाही? BCCIने सांगितलं कारण

Ganesh Chaturthi 2026: गणेशभक्तांनो, मुहूर्ताची वेळ लक्षात ठेवा! पहाटे ४.५० ते दुपारी १.५१ पर्यंत गणरायाची प्रतिष्ठापना

Bombay High Court: ‘स्मोकिंग तंबाखू’ खाद्यपदार्थ नाही; एफएसएस कायद्यानुसार कारवाई करता येणार नाही, नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Marathi News Live Updates : मयूर रथातून दगडूशेठ गणपती बाप्पाची आगमन मिरवणूक; रंगीबेरंगी फुलांनी सजला रथ; सकाळी ८ वाजता मुख्य मंदिरातून मिरवणुकीला सुरुवात

SCROLL FOR NEXT