Satara Latest Marathi News 
सातारा

मांढरदेव, सुरुर परिसरात जमावबंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Balkrishna Madhale

सातारा : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने काळूबाई देवी (ता. वाई) व दावजी बुवा यात्रा सुरुर या दोन्ही यात्रा आयोजित करण्यास मनाई करण्यात आली आहे. या यात्रांनिमित्त जिल्हा दंडाधिकारी शेखर सिंह यांनी 16 जानेवारी ते 14 फेब्रुवारी या कालावधीत 144 कलम लागू करण्याचे आदेश दिले आहेत.

या आदेशानुसार, काळूबाई देवी यात्रा, मांढरदेव (ता. वाई) व दावजी बुवा यात्रा सुरुर या दोन्ही यात्रा आयोजित करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. तसेच कोणत्याही प्रकारे गर्दी आकर्षित होणार नाही, अशा धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे अथवा मिरवणुकांचे आयोजन करण्यात येऊ नये. यात्रेतील धार्मिक कार्यक्रम मंदिराचे पुजारी व ट्रस्टचे सदस्य यांनीच पार पाडावी. त्या व्यतिरिक्त इतर व्यक्तींना कार्यक्रमास उपस्थित राहण्यास मनाई असेल, तसेच यात्रा कालावधीत ट्रस्टी व पुजारी वगळून इतर व्यक्तींना दर्शनासाठी बंदी असेल.

यात्रा कालावधीत भाविकांना, तसेच स्थानिकांना रहिवासासाठी तंबू उभारण्यास व पशू व पक्षी यांचा बळी देण्यास मनाई करण्यात आली आहे. 16 जानेवारी ते 14 फेब्रुवारी या कालावधीत वाई ताकुक्यातील मौजे मांढरदेव गावासह मांढरदेव गावापासून 10 किलोमीटर परिसर, मौजे परखंदी, डुईचीवाडी, पिराचीवाडी, बालेघर, सुलतानपूर, लोहारे, वेरुळी, मुंगसेवाडी, सटालेवाडी, एमआयडीसी वाई, शहबाग, अंबाडे खिंड, बोपर्डी, धावडी फाटा रेणुसेवस्ती, गुंडेवाडी, कोचळेवाडी, काळुबाई मंदिर जमादाडे वस्ती शेजारी वाई, वाई शहर व सुरुर, तसेच खंडाळा तालुक्यातील कर्नवडी, झगलवाडी, अतिट व लिंबाचीवाडी येथील सार्वजनिक ठिकाणी अगर रस्त्यावर मोठ्या संख्येने एकत्र येणे अथवा गर्दी करण्यासही मनाई करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

80s Retro AI Trend Maharashtra : रे-बॅन गॉगल, जीन्स, यामाहा अन् १९८०चा लूक; शौमिका महाडिक, मुरलीधर मोहोळांसह नेत्यांचे रेट्रो फोटो व्हायरल

सचिन पिळगांवकरांना ट्रोल करणाऱ्यांना लेकीनं सुनावलं, नेटकऱ्यांनाही सडेतोड उत्तर देत म्हणाली...

Bay of Bengal low pressure area : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र; महाराष्ट्रात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता

Marathi News Live Updates : सदाशिव पेठेत जुन्या वादातून एमपीएससी करणाऱ्या तरुणाचे अपहरण करून बेदम मारहाण

Solapur Ujani Dam: गाळाने उजनीची १६.४२ टक्के साठवण क्षमता गिळली! केंद्रीय जल आयोगाचा धक्कादायक अहवाल; ५४५.०५ दशलक्ष घनमीटर क्षमतेचे नुकसान

SCROLL FOR NEXT