Satara Latest Marathi News, Satara News 
सातारा

साताऱ्यात बांधकाम व्यावसायिकांची धरणे; सिमेंटसह स्टील दरवाढीचा निषेध

गिरीश चव्हाण

सातारा : सिमेंट आणि स्टील उत्पादक कंपन्यांनी मनमानी करत दर वाढल्याने बांधकाम क्षेत्र अडचणीत आल्याचा आरोप करत येथे बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियाच्या सातारा शाखेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. याबाबतचे निवेदन आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले असून, यात सिमेंट, स्टील दरवाढीची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. 

या आंदोलनात सातारा शाखेचे अध्यक्ष श्रीराज दीक्षित, राजेश देशमुख, विजयसिंह जगदाळे, अशोक शिंदे, सचिन देशमुख, संदीप जाधव, ओमकार शिंदे, सागर निंबाळकर, किशोर लोखंडे व इतर पदाधिकारी सहभागी झाले होते. निवेदनात म्हटले आहे, की देशात उत्पादित होणारे 55 टक्के सिमेंट बांधकाम क्षेत्रासाठी, तर त्यापेक्षाही जास्त लोखंड वापरण्यात येते. गेल्या काही दिवसांपासून या दोन्ही वस्तूंची भाव वाढ होत आहे. या भाववाढीमुळे करारानुसारची बांधकामे पूर्ण करणे व्यावसायिकांना अशक्‍य झाले आहे. 

दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या स्वस्तातील घराची संकल्पना मातीत मिळाली आहे. कोरोना व इतर कारणांमुळे अडचणीत आलेले बांधकाम क्षेत्र तेजीत येत असतानाच त्याला दरवाढीचा फटका बसला असून, परिणामी रोजंदारीवरील कामगारांच्या हाताला काम मिळणे दुरापास्त झाले आहे. आगामी काळात बांधकाम व्यवसाय आणखी अडचणीत येऊ नये, यासाठी सरकारने सिमेंट, स्टील नियंत्रण प्राधिकरण निर्माण करण्याची गरज असून, झालेल्या दरवाढीची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणीही आंदोलक बांधकाम व्यावसायिकांनी निवेदनात केली आहे. 

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Kesari News : महाराष्ट्र केसरीत थरार शिगेला; जय, हर्षवर्धन, महेंद्र व सिकंदर अंतिम फेरीत

Power Supply Interrupted : सात हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित; महावितरणकडून वसुली करण्यावर जोर

Iran-America War: इराणमध्ये अडकून पडलेल्या कच्च्या तेलाच्या विक्रीचा मार्ग मोकळा; अमेरिकेकडून निर्बंध मागे

Electric Bus : इलेक्ट्रिक बस ठरताहेत ‘पांढरा हत्ती’; सुमारे तीन हजार कोटींच्या मदतीसाठी महामंडळाचे साकडे

Ashok Kharat Files : भोंदू खरातची दिवसभर कसून चौकशी; नीरजकडून महत्त्वाची माहिती; मोबाईल, सीडीआर मागवला

SCROLL FOR NEXT