सातारा

कऱ्हाडात 20 कोटींच्या कामांना मंजुरी; पालिकेची सभा चर्चेविना तीन मिनिटांत शांततेत!

सचिन शिंदे

कऱ्हाड (जि. सातारा) : वाढीव हद्दीसह शहरात 14 प्रभागांत शासनाच्या विविध योजनातून हाती घ्यावयाच्या सुमारे 20 कोटींच्या विकासकामांना पालिकेच्या विशेष सभेत एकमताने मंजुरी मिळाली. अवघ्या तीन मिनिटांत कोणतीही चर्चा न करता सर्वांनी एकमताने विषय मंजूर केला. त्यामुळे काल (शुक्रवारी) प्रथमच शांततेत सभा पार पडली. नगराध्यक्षा रोहिणी शिंदे अध्यक्षस्थानी होत्या.

जिल्हास्तरीय नगरोत्थान योजना 7 कोटी 50 लाख, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना 2 कोटी 65 लाख, नागरी दलितेतर योजना एक रोटी 50 लाख असा निधी 11 कोटी 65 लाखांचा निधी 2020-21 चा मंजूर झाला. 2021-22 मधील योजनांत 7 कोटी 50 लाखांचा निधी मंजूर झाला. हा निधी पालिकेकडे आला होता. त्या निधीतून 14 प्रभागांमध्ये विविध कामे प्रस्तावित केली आहेत. त्यात रस्ते, गटर्स, समाजमंदिरे यासह मूलभूत सुविधांवर भर देण्यात आला आहे. ती कामे नगरसेवकांकडून प्रस्ताव घेऊन केली आहेत. त्यासाठी मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी समन्वयाची भूमिका घेतली आहे. कामे निश्‍चित करण्यासाठी पालिकेत आघाड्यांच्या दोन बैठका पार पडल्या. त्यात कामे घेण्यावर सगळ्यांचे एकमत झाले होते. नियोजन सभापती विजय वाटेगावकर यांनी सूचना वाचली. लोकशाहीचे गटनेते सौरभ पाटील यांनी अनुमोदन दिले. नगर अभियंता यांनी एन. एस. पवार यांनी माहिती दिली. त्यानंतर विषय मंजूर करण्यात आला. 

सिंथेटिक हुवा कोर्टला मंजुरी 

छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमच्या बॅडमिंटन हॉलमध्ये बॅडमिंटन कोर्ट आहे. ते कोर्ट 25 वर्षे जुने आहे. तेथे आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय सामने सिंथेटिक हुवा कोर्टवर होतात. त्यामुळे येथील खेळाडूंनी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे सिंथेटिक हुवा कोर्टची मागणी केली होती. त्यानुसार पालकमंत्र्यांनी डीपीडीसीतून प्रस्ताव मंजुरीचे आदेश दिले आहेत. त्या कामास 20 लाखांपेक्षा जास्त खर्च येणार आहे. मात्र, कऱ्हाडच्या बॅडमिंटन खेळाडूंची अनेक वर्षांची मागणी त्या निमित्ताने पूर्ण होणार आहे. त्यालाही पालिका सभेत मंजुरी दिली. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Italian Style Aloo Paratha: आलू पराठ्याला द्या 'हा' इटालियन ट्विस्ट! चव अशी की रोज हाच पराठा मागाल

आजचे राशिभविष्य - 12 सप्टेंबर 2026

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

SCROLL FOR NEXT