सातारा

राज्य माथाडी सल्लागार समितीवर खंडाळ्यातील दत्तात्रय ढमाळांची निवड

अशपाक पटेल

खंडाळा (जि. सातारा) : महाराष्ट्र शासनाच्या राज्य माथाडी सल्लागार समितीवर सातारा जिल्हा राष्ट्रवादीच्या औद्योगिक सेलचे अध्यक्ष व उद्योजक दत्तात्रय उर्फ बंडू ढमाळ ( रा. असवली ता. खंडाळा) यांची राज्य शासनाने नुकतीच निवड केली आहे.

बंडू ढमाळ हे गेली अनेक वर्ष शिरवळ व खंडाळा एमआयडीसीमध्ये कामगारांच्या व व्यापारी यांच्यासंबंधी कार्यरत आहेत. विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर व आमदार मकरंद पाटील यांनी त्यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस औद्योगिक जिल्हाध्यक्ष पदाची धुरा सोपवली असून ढमाळ यांनी भूमिपुत्राच्या हाताला काम  मिळावे व खंडाळा तालुक्यातील औद्योगिकरण सुरळीत चालावे, यासाठी विशेष प्रयत्न केले. 

या कामाची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने त्यांना माथाडी समितीवरील मालक प्रतिनिधी म्हणून राज्यस्तरावर काम करण्याची संधी निर्माण करुन दिली. यामुळे इंडस्ट्री व व्यापारांचे प्रश्न आग्रक्रमाने मांडणे व सोडवणे ही प्रमुख जबाबदारी या समितीची असणार आहे. ढमाळ यांच्या नियुक्तीमुळे सातारा जिल्ह्यातील औद्योगिकरणाचे प्रश्न शासन दरबारी सोडवणे अधिक सोयीस्कर ठरणार आहे. या नियुक्तीबद्दल सभापती रामराजे नाईक-निंबाळकर व आमदार पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, सभापती राजेंद्र तांबे, जिल्हा परिषद सदस्य मनोज पवार आदींसह नागरिक व कामगार यांनी अभिनंदन केले.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: अजित पवार अन् शरद पवार लग्न सोहळ्यानिमित्त एकत्र

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : राजस्थान क्वालिफाय करणार की हैदराबाद मजबूत स्थितीत पोहचणार?

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

PPF : दररोज 250 रुपये वाचवून तयार होईल 24 लाखांचा फंड, कसा ते वाचा ?

SCROLL FOR NEXT