सातारा

महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणीत एटीएम दोन महिन्यांपासून बंद; ग्राहकांसह पर्यटकांची गैरसोय

रविकांत बेलोशे

भिलार (जि. सातारा) : पाचगणी (ता. महाबळेश्वर) या पर्यटनस्थळांवर असणारे स्टेट बॅंकेचे एटीएम हे गेल्या दोन महिन्यांपासून बंद आहे. ऐन पर्यटन हंगामात हे एटीएम बंद असल्याने ग्राहक व पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. त्यामुळे हे सेंटर असून अडचण आणि नसून खोळंबा अशी स्थिती झाली आहे. 

पाचगणी या पर्यटनस्थळांवर बॅंक ऑफ महाराष्ट्र, आयडीबीआय, स्टेट बॅंक, जावली बॅंक अशा मोजक्‍याच एटीएम सेंटरची सेवा आहे; पण कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत हे एटीएम बंद असतात. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सर्व बॅंकाचे एटीएम हे दररोजच्या दररोज सुरू ठेवणे, असा आदेश सर्व बॅंकांना काढला आहे. ज्या बॅंकेचे एटीएम बंद असल्यास त्या बॅंकेच्या शाखेला दंड केला जाईल, असे आदेशात म्हटले असतानाही बॅंकेचे स्थानिक अधिकारी व कर्मचारी लक्ष देत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. पाचगणी हे पर्यटनस्थळ असल्याने या ठिकाणी पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते, हे पर्यटक सर्व व्यवहार ऑनलाइन करीत असल्याने आता एटीएम सेंटर ही अत्यावश्‍यक गरज झाली आहे. स्टेट बॅंक या नामवंत बॅंकेचे एटीएम सेंटर हे सलग दोन महिने बंद असल्याने ग्राहक व पर्यटकांना ही सेवा मिळत नसल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. हे एटीएम सेंटर एक तर हे सुरळीत सुरू ठेवा अन्यथा ते काढून टाका, अशी मागणी ग्राहकांतून होत आहे.

ढिसाळ सेवेमुळे ग्राहक नाराज 
स्टेट बॅंकेत दोनच कर्मचारी असल्याने या बॅंकेत व्यवहार करताना ग्राहकांना ताटकळत बसावे लागते, तर किरकोळ कामालाही तासभर लागत आहे. चेक व्यवस्थेची तर बोंबाबोंब आहे. खात्यावर भरलेला चेक वाटण्यासाठी आठवडा उलटला तरी प्रक्रिया होत नाही, या ढिसाळ सेवेमुळे ग्राहक नाराज आहेत. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Budget 2026 : अर्थसंकल्पात विवाहिताना मोठा दिलासा? पती-पत्नीला आता कमी कर भरावा लागणार; नेमका काय फायदा होणार?

Mumbai News: परप्रांतीयांकडून भाजप कार्यकर्त्यांना जबर मारहाण, कुर्ल्यातील घटनेचा व्हिडिओ व्हायरल

Tractor Driver Wins Lottery : ट्रॅक्टर ड्रायव्हरने जिंकली १० कोटींची लॉटरी, एका रात्रीत बदलले नशीब

विधानपरिषदेची मुदत संपताच राजकारणातून निवृत्त होणार, राजकीय परिस्थितीला कंटाळून भाजप आमदाराचा तडकाफडकी निर्णय!

Healthy Lifestyle Tips: ५ मिनिटांची एक्स्ट्रा झोप, २ मिनिटांचं एक्स्ट्रा चालणं तुमचं आयुष्य एक वर्षाने वाढवतं! वाचा संशोधन काय सांगतं

SCROLL FOR NEXT