Satara Latest Marathi News 
सातारा

'कृष्णा'च्या सत्तेत विरोधकांनी काय दिवे लावले?; भाजपच्या नेत्याची जोरदार टीका

सचिन शिंदे

कऱ्हाड (जि. सातारा) : कृष्णा कारखान्याच्या सत्तेसाठी विरोधक आतापासूनच गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत. मात्र, सत्तेत असताना त्यांनी कारखान्यात काय दिवे लावले, याचे आत्मपरीक्षण करावे, असे प्रतिपादन कृष्णा सहकारी बॅंकेचे अध्यक्ष अतुल भोसले यांनी केले. 

यशवंतराव मोहिते कृष्णा कारखान्याच्या वारुंजी व पार्ले परिसरातील सभासद संपर्क बैठकीत ते बोलत होते. कारखान्याचे उपाध्यक्ष जगदीश जगताप, संचालक धोंडीराम जाधव, धनलक्ष्मी पतसंस्थेचे अध्यक्ष दिलीप चव्हाण, माणिकराव पाटील, प्रफुल्ल पाटील, दादासाहेब मेजर, हरिभाऊ पाटील, रयत शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे, राहुल पाटील, बाबासाहेब नलवडे उपस्थित होते. 

श्री. भोसले म्हणाले, "कृष्णा कारखान्याने गेल्या 5 वर्षांत 3 हजार रुपयांहून अधिक दर दिला आहे. पाच वर्षांत साखर उतारा सर्वाधिक राहिला आहे. शेतकऱ्यांच्या बिलातून कोणतीही कपात न करता कारखान्याचा विस्तार केला गेला. ज्यामुळे आज कृष्णा कारखाना 9000 हजार मेट्रिक टनापर्यंत गाळप करतो. भविष्यात 12 हजार मेट्रिक टन गाळप क्षमता करण्याचे नियोजन आहे. मागील संचालक मंडळाने कर्जाचा डोंगर उभा केला. त्यांच्या काळात तोडणी वाहतुकीची थकबाकी कोट्यवधी रुपयांची होती; पण डॉ. सुरेशबाबांच्या कार्यकाळात एक रुपयाही थकबाकी नाही.'' या वेळी प्रकाश पाटील, प्रमोद पाटील, तानाजी नलवडे, धोंडीराम निकम, तुकाराम जाधव, संभाजी नलवडे, आनंद नलवडे, भिकाजी पाटील, गोरख नलवडे, महेश पाटील, सयाजी पाटील यांनी मनोगते व्यक्त केली. 

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bullet Train Tunnel : समुद्राखालील बुलेट ट्रेन बोगद्याला वेग; दुसऱ्या टीबीएमने खोदकामाला सुरुवात

Rohit Sharma Retirement: 'सचिन-गावसकरही गेले, रोहितलाही जावं...' हिटमॅनच्या निवृत्तीच्या चर्चांवर कपिल देव यांचं विधान चर्चेत

Ahmedabad Fire: फटाक्यांच्या कारखान्यात भीषण आग; स्फोटांनी हादरला परिसर, ८ जणांचा मृत्यू, अनेक जखमी, कुठे घडली घटना?

Mumbai News: केईएमच्या कारभाराची मध्यरात्री पाहणी, डॉक्टरांची अनुपस्थिती; रुग्णांच्या उपचारात विलंब

Mumbai News: बदनामी करू नका, महेश ट्युटोरियलन्सने ३३ शाखा बंद करण्याचं सांगितलं कारण; मुंबईत ३० हजार क्लासेस सुरू

SCROLL FOR NEXT