Satara Latest Marathi News 
सातारा

Corona Virus : बॅंडबाजा बारात, बॅंडचालक अद्याप घरात; कलाकारांना पुन्हा संसर्गझळा

ऋषीकेश पवार

विसापूर (जि. सातारा) : अथक परिश्रमानंतर नियंत्रित झालेल्या कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढल्याने सार्वजनिक कार्यक्रमांवर मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे ऐन लग्नसराईत काही विवाह सोहळे रद्द झाले आहेत. तर काही ठिकाणी हे सोहळे आप्तेष्टांच्या उपस्थितीमध्ये साधेपणाने साजरे होत आहेत. परिणामी हाताला काम नसल्याने पुसेगाव परिसरातील बॅंडचालक आणि कलाकारांना संसर्गझळा बसत असून, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. परिणामी, बॅंड व्यवसायाचाच बॅंडबाजा वाजत असल्याचे चित्र समोर येत आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेला बॅंड व्यवसाय "मिशन बिगीन अगेन'मध्ये जनजीवन पूर्ववत येत असताना काही दिवस सुरू होता. त्यामुळे काही प्रमाणामध्ये या कलाकारांना व त्यांच्या कुटुंबीयांना दिलासा मिळाला होता. मात्र, पुन्हा एकदा कोरोनाचा आलेख हळूहळू उंचावू लागल्याने या बॅंड व्यवसायावर संक्रांत आली आहे. आजमितीला बॅंडचालकांनी बॅंकेचे कर्ज तसेच हातउसने पैसे घेऊन हा व्यवसाय सुरू केला आहे. पण, व्यवसायच बंद असल्याने बॅंकांचे हप्ते भरायचे कुठून? आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा कसा? अशा विवंचनेत बॅंड व्यावसायिक सापडल्याचे दिसून येत आहेत. 

सध्या जिल्ह्यात जवळपास 300 बॅंड पथके आहेत. यावर सहा ते सात हजार कलाकार व त्यांची कुटुंबे अवलंबून आहेत. हाताला काम नसल्याने या कलाकारांची आर्थिक कोंडी झाली असून, त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. या सर्व बाबींचा विचार करता बॅंड व्यावसायिक तसेच कलाकारांच्या उपजीविकेच्या प्रश्नांचा सरकारने गांभीर्याने विचार करून त्यांना तातडीने आर्थिक मदत करण्याची गरज दिसून येत आहे. 

थोड्या प्रमाणात सुरू झालेला व्यवसाय पुन्हा बंद झाल्याने आर्थिक अवस्था फारच दयनीय झाली आहे. घराचा गाडा कसा चालवावा, असा प्रश्न आहे. शासनाने तातडीने आर्थिक मदत करून व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिली पाहिजे.'' 

-दिलीप माने, बॅंड व्यावसायिक, पुसेगाव 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बॅंड व्यवसायावर निर्बंध आल्याने चालक तसेच कलाकार बेरोजगार झाले आहेत. ज्याप्रमाणे शेतकऱ्यांना व औद्योगिक क्षेत्राला शासनाकडून मदत होते, त्याचप्रमाणे याही वर्गाला मदत मिळाली पाहिजे, अन्यथा त्यांचे जगणेच अवघड होईल.'' 

-अशोक जाधव, प्रदेशाध्यक्ष, बॅंड-बेंजो चालक-कलाकार संघटना, महाराष्ट्र 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Bomb Case: सीसीटीव्हीतील व्यक्ती स्वतःहून पोलिसांसमोर; पण निघाला MR, बॉम्ब प्रकरणाशी काहीही संबंध नाही!

Latest Marathi News Live Update : नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी शुभम खैरनार वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया प्रशिक्षण केंद्र चालवत असल्याचं समोर

Breaking : हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव पंजाब किंग्सच्या सामन्याला मुकणार; Mumbai Indians चं नेतृत्व कोण करणार?

Raj Thackeray: केंद्राचा एकछत्री कारभार विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर घाला... 'NEET' पेपरफुटीवर राज ठाकरेंचा संताप, सरकारवर जोरदार हल्ला

Yerwada Prison Escape : येरवडा खुल्या कारागृहातून जन्मठेपेचा कैदी फरार; आठवड्यातील दुसरी घटना, सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT