Satara Latest Marathi News 
सातारा

'पूजा चव्हाणच्या मृत्यूला राठोडच जबाबदार'; साताऱ्यात वनमंत्र्यांविरुध्द भाजपची निदर्शने

गिरीश चव्हाण

सातारा : पूजा चव्हाण हिच्या संशयास्पद मृत्यूला वनमंत्री संजय राठोड जबाबदार असून, त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आज भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीच्या वतीने साताऱ्यातील बॉंबे रेस्टॉरंट परिसरात रास्तारोको करण्यात आला. 

या आंदोलनात भाजपा महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा सुवर्णा पाटील, सुरभी चव्हाण, मनिषा पांडे, मोना निकम, वैष्णवी कदम, निर्मला पाटील, अश्‍विनी हुबळीकर, उमल गिरमे, हेमा भणगे, अलका भणगे व इतर पदधिकारी तसेच महिला सहभागी झाल्या होत्या. पूजा चव्हाण हिचा सात फेब्रुवारी रोजी पुणे येथे संशयास्पद मृत्यू झाला होता. या मृत्यूप्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांचा सहभाग असल्याचे पुरावे असतानाही पोलिस त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. 

पोलिसांची भूमिका संशयास्पद असून, या प्रकरणात मोठ्या प्रमाणात राजकीय दबाव आहे. सत्ताधारी पक्षाचा मंत्री असल्याने राठोड यांना वाचविण्याचा प्रयत्न होत असून, त्यांचा राजीनामा घेण्यात यावा, अशी मागणी भाजपाने केली आहे. मागणीकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा भाजपाने दिला होता. यानुसार हे आंदोलन करण्यात येत असून, जोपर्यंत राठोड यांना अटक होत नाही, त्यांचा राजीनामा घेण्यात येत नाही, तोपर्यंत सुरुच ठेवण्याचा इशारा यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात देण्यात आला आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: साखर झोपेत असताना भयंकर घडलं! ठाण्यात २५ वर्षे जुन्या सदनिकेचा काही भाग कोसळून दुर्घटना; २ जखमी

Pune Crop Insurance: पुणे जिल्ह्यात सुमारे ८३,००० शेतकऱ्यांनी काढला पीक विमा; २३८ कोटी रुपयांचे मिळणार पीक विमा सुरक्षा कवच

‘मला वाटलं मी मरणारच…’ कॅन्सरच्या निदानानंतरची ती भयानक रात्र सांगताना मनीषा कोईराला भावुक, म्हणाल्या...

Marathi News Live Updates : चाकणमध्ये ५ ते ७ किमी वाहनांच्या लांबच लांब रांगा! खड्ड्यांमुळे चाकण महामार्गावर अपघात; २ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू, दोघे गंभीर

पुण्यातील बुधवार पेठेत सपना बिल्डिंगमध्ये पोलिसांचा छापा... समोर जे दिसलं ते धक्कादायक, २ जणांना अटक

SCROLL FOR NEXT