Satara Latest Marathi News 
सातारा

गोंदवल्यात संचारबंदी लागू; समाधी मंदिरासह आठवडा बाजार बंद

फिरोज तांबोळी

गोंदवले (जि. सातारा) : मकरसंक्रांतीच्या सणामुळे महिलांसह भाविकांची गर्दी टाळण्यासाठी उद्या (गुरुवारी) श्री ब्रह्मचैतन्य महाराज समाधी मंदिरासह गोंदवल्यातील सर्वच मंदिरे दर्शनासाठी बंद राहणार आहेत. उद्याचा आठवडा बाजारही बंद राहणार आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मर्यादित भाविकांच्या उपस्थितीत श्री ब्रह्मचैतन्य महाराज समाधी मंदिरात नुकताच "श्रीं'चा पुण्यतिथी सोहळा साध्या पद्धतीने करण्यात आला. मुख्य दिवशी भाविकांची गर्दी टाळण्यासाठी दर्शन बंद ठेवण्यात आले होते. आता मकरसंक्रांतीच्या सणानिमित्त वाणवसा घेण्यासाठी महिला भाविकांची गर्दी होण्याची शक्‍यता असल्याने उद्या सकाळी सहा ते रात्री आठ वाजेपर्यंत मंदिर बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. या काळात मंदिर परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. 

गोंदवल्यातील मंदिर परिसरात संचारबंदी आदेश असल्याने येथील आठवडा बाजारही भरणार नसल्याचे प्रशासनाकडून आज उशिरा सांगण्यात आले. बाजार पटांगण परिसरातील मंदिरेही उद्या बंद राहणार असल्याचे मंदिर समितीने कळविले आहे. गेल्या आठवड्यात "श्रीं'च्या पुण्यतिथी महोत्सवाच्या मुख्य कार्यक्रमामुळे गुरुवारचा आठवडा बाजार बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळे सलग दुसऱ्यांदा हा बाजार बंद राहणार आहे. 

प्रशासनावर अतिरिक्त ताण 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करताना दमछाक झालेल्या प्रशासनाला सध्या ग्रामपंचायत निवडणुकीमुळे तारेवरची कसरत करावी लागत आहे. शुक्रवारी हे मतदान होत असून, उद्या मकरसंक्रांतीमुळे होणारी गर्दी टाळण्यासाठी मंदिरे बंद ठेऊन लोकांची काळजी घेण्याचे कसब करावे लागणार असल्याने प्रशासनावर ताण आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bankipur Election Result 2026 : भाजपाला मोठा धक्का! ३० वर्षांचा गड ढासळला; बांकीपूर पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा दणदणीत विजय

Dimbhe Dam : डिंभे धरणाचा विसर्ग वाढला; लाखणगावचा पूल पाण्याखाली, बेल्हे-जेजुरी महामार्गावरील वाहतूक ठप्प

Latest Marathi News Live Update : ''गुन्हेगाराला मुख्यमंत्री बनवलं तर....''; बांकीपूरच्या निकालावर काय म्हणाले प्रशांत किशोर?

'पूर्ण सिस्टमच त्याला वाचवतेय...'; बृजभूषण यांच्या निर्दोष सुटकेनंतर Vinesh Phogat काय म्हणाली? मोठं पाऊल उचलण्याचा इशारा

Temple Development : डोंगरगाव शिवच्या तोंडेश्वर महादेव मंदिराला तीर्थक्षेत्र 'ब' वर्गाचा दर्जा; आमदार अनुराधा चव्हाण यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

SCROLL FOR NEXT