सातारा

'व्याज परत दे नाहीतर, प्लॅट नावावर कर'; खासगी सावकारीचा कऱ्हाडला तिघांवर गुन्हा

सचिन शिंदे

कऱ्हाड (जि. सातारा) : शहर पोलिसात तिघांवर खासगी सावकारी अंतर्गत गुन्हा नोंद झाला. विजय नाथाजी घाडगे व अन्य दोघे जण (त्यांची नावे समजू शकली नाहीत) अशी गुन्हा नोंद झालेल्यांची नावे आहेत. त्याबाबत संजय गायकवाड (वय 43, रा. मुळीक चौक, मूळ रा. कार्वे) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी सांगितले, की विजय घाडगे व त्याच्या सोबतच्या दोघांनी संजय गायकवाडला व्याजाने घेतलेली मुद्दल परत दे नाहीतर तुझा विजयनगर येथील प्लॅट किंवा मसूर येथील दोन गाळे माझे नावावर कर, अशी धमकी दिली होती. त्याला शिवीगाळ व दमदाटी केली. त्यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार खासगी सावकारींतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. संजय गायकवाड यांनी विकास घाडगे यांच्याकडून बांधकाम व्यवसायासाठी दरमहा दरशेकडा सात टक्के दराने 3 लाख रुपये व्याजाने घेतले होते. 

गायकवाड यांनी आजपर्यंत दीड लाख रुपये व्याजाचे पैसे दिलेले असतानासुद्धा विकास घाडगे याने माझे घेतलेले तीन लाख रुपये व त्यावरील व्याज परत दे नाहीतर तुझा विजयनगर येथे असलेले प्रथमेश प्लाझा येथील प्लॅट किंवा मसूर येथील दोन गाळे माझे नावावर कर अशी मागणी करून विजय घाडगे व त्याचे दोन मित्रांनी हेड पोस्ट मागील मुळीक चौकातील ए एस ज्वेलर्स जबरदस्तीने बंद करून शिवीगाळ, दमदाटी करून फिर्यादीचा कामगार सचिन सोपान शिरसाठ यास दुचाकीवर बसवून घेऊन गेले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: पाकिस्तान - युएई सामना होणार? आता PCB ने केली मोठी विनंती; खेळाडू स्टेडियमकडे रवाना

Kunbi Certificates: ''भुजबळांना कुणबी प्रमाणपत्रांबद्दल आक्षेप असेल तर..'', फडणवीसांनी स्पष्टच शब्दात सांगितलं

Chhatrapati Sambhajinagar News : आमदार विलास भुमरे प्रभारी जिल्हाप्रमुख; पैठण, फुलंब्री, सिल्लोड मतदारसंघांची दिली जबाबदारी

Kedarkheda Accident : देऊळगाव ताड येथील नामदेव गाडेकर यांचा बसच्या धडकेने मुत्यु

Latest Marathi News Updates : पाकिस्तानने आशिया कपवर बहिष्काराचा निर्णय बदलला? खेळाडूंनी सोडलं हॉटेल

SCROLL FOR NEXT