सातारा

शिवप्रताप दिन : शिवरायांच्या जयघोषाने प्रतापगड दुमदुमला

अभिजीत खुरासणे

महाबळेश्वर (जि. सातारा) : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर किल्ले प्रतापगड परिसरात जिल्हा प्रशासनाने 144 कलम लागू केले आहे, तसेच ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची आचारसंहिता लागू असल्याने या वर्षी किल्ले प्रतापगडावर शिवप्रतापदिन अत्यंत साधेपणाने कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करीत शासनाच्या वतीने पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. दरम्यान, जिल्हा पोलिस दलाच्या वतीने सर्वत्र चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
 
अफझल खानाचा वध करून छत्रपती शिवाजी महराजांनी हिंदवी स्वराजाची मुहूर्त मेढ रोवली. या शिवरायांच्या पराक्रमानिमित्त प्रतिवर्षी किल्ले प्रतापगडावर शिवप्रतापदिन शिवप्रेमी, शालेय विद्यार्थ्यांच्या सहभागाने छत्रपती शिवरायांचा व भवानी मातेचा जयजयकार करीत पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. याच वेळी विद्यार्थ्यांचे खेळ, ढोल-लेझीम पथके यांचा सहभाग, शिवकालीन मर्दानी खेळांची प्रात्याक्षिके, छत्रपतींच्या प्रतिमेची मिरवणूक व छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी, तसेच शिवरायांच्या जीवनावरील पोवाडे, गायन आदी भरगच्च कार्यक्रम हे दरवर्षीच्या येथील शिवप्रतापदिनाचे खास वैशिष्ठ्ये असते. पूर्वी हा सोहळा प्रतापगड उत्सव समिती व महाराष्ट्रातील विविध भागातील शिवप्रेमी मोठ्या जल्लोषात साजरा करायचे. त्यानंतर गेली बारा वर्षांपासून आजतागायत शासनाच्या वतीने तो साजरा केला जातो. मात्र, यावर्षी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर किल्ले प्रतापगड परिसरात जिल्हा प्रशासने 144 कलम लागू केल्याने, तसेच ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची आचारसंहिता लागू असल्याने किल्ले प्रतापगडावर शिवप्रतापदिन साधेपणाने साजरा करण्यात आला.

सकाळी जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक गौडा यांच्या शुभ हस्ते भवानी मातेची पूजा व महाआरती करण्यात आली. यावेळी डी. वाय. एस. पी. डॉ. शीतल जानवे-खराडे, उपविभागीय अधिकारी संगीता राजापूरकर, उपवन संरक्षक श्री. हाडा, महाबळेश्वरच्या तहसीलदार सुषमा चौधरी-पाटील, मुख्याधिकारी पल्लवी पाटील, पोलीस निरीक्षक कोंडूभैरी, गटविकास अधिकारी नारायण घोलप, विजय हवालदार, अभय हवालदार, व्यवस्थापक ओमकार देशपांडे, पुजारी मंगेश बडवे, ओमकार दंडवते, प्रमोद पवार, आनंदा उतेकर, चंद्रकांत आप्पा उतेकर, विलास मोरे व प्रतापगड ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान, भवानी मातेच्या मंदिरासमोर ध्वजस्तंभाचे मान्यवरांच्या ह्रस्ते विधीवत पूजन करुन शिवशाहीचे प्रतीक असणाऱ्या भगव्या ध्वजाचे रोहण जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक गौडा यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर मानाच्या पालखीची मान्यवरांच्या हस्ते पूजा करण्यात आली.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SRH vs RR Live IPL 2024 : हैदराबाद पुन्हा 200 पार! रेड्डी अन् क्लासेननं स्लॉग ओव्हरमध्ये राजस्थानला धुतलं

Akola News : अनुपजी..भाजपचे पैसे पोहचले नाही; व्हीडिओ व्हायरल, बार्शिटाकळीत गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update: अमेठीत राहुल गांधींच्या उमेदवारीची चर्चा; कार्यकर्त्यांनी पोस्टर्सही छापले

Commuter Murder Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! गर्दुल्यांकडून ट्रेनमध्ये हैदोस

SCROLL FOR NEXT