सातारा

अभ्यासू नेतृत्व हरपल्याने राज्याची मोठी हानी; मुख्यमंत्र्यांची विलासकाकांना श्रद्धांजली

Balkrishna Madhale

सातारा : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी सहकार मंत्री विलासकाका पाटील-उंडाळकर याचं आज (सोमवारी) पहाटे उपचार सुरू असताना सातारा येथे निधन झाले. त्यांच्यावर त्यांच्या मूळगावी उंडाळे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. विलासकाकांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही शोक व्यक्त केला आहे. राज्याच्या सहकार, ग्रामविकास यांसह सामान्यांच्या जीवनाशी निगडीत महत्वपूर्ण विषयांतील अभ्यासू आणि मार्गदर्शक नेतृत्व हरपले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी विलासरावांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांच्या निधनाने राज्याची मोठी हानी झाल्याचेही त्यांनी म्हटले आहे. 

पूर्वीच्या दुर्गमडोंगराळ भागातील उंडाळे येथे जन्मलेल्या विलासराव पाटील यांना त्यांच्या वडिलांचा मोठा वारसा लाभला. स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी मोठे योगदान दिले. त्यांचा वारसा विलासकाका यांनी पुढे चालवला. स्वातंत्र्य सेनानी कुटुंबांचा वारसा जपत विलासकाका यांनी सुरू केलेली राजकीय वाटचाल समाजकारणाशी जोडलेली होती. राज्याच्या मंत्रिमंडळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या सांभाळून सहकार, ग्रामविकास, जलसंधारण या क्षेत्रात भरीव असे काम केले.

अनेक संस्था आणि सामाजिक उपक्रमांना त्यांनी जाणीवपूर्वक बळ दिले. विविध विषयांतील गाढा अभ्यास आणि परखडपणामुळे ते अनेकांसाठी मार्गदर्शक व्यक्तिमत्व होते. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारण-समाजकारणातील दोन पिढ्यांना जोडणारे मार्गदर्शक नेतृत्व हरपले आहे. ज्येष्ठ नेते माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांना विनम्र श्रद्धांजली, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. विलासकाकांच्या निधनाने राज्याची मोठी हानी झाल्याचेही त्यांनी म्हटले आहे. 

https://www.facebook.com/UddhavBalasahebThackeray/posts/3609314729183867

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: विद्यार्थी आंदोलनात हस्तक्षेप करण्याचे कारण काय? बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या निर्णयावर CJI सूर्यकांत भडकले

Mitchell Starc: मिचेल स्टार्कने रचला इतिहास! कपिल देवांना मागे टाकलं, मुरलीधरन नंबर-1; टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट कोणाच्या नावावर?

लाँग डिस्टन्स रिलेशनमध्ये राहूच नका... आजच्या पिढीला मृणाल दुसानिसचा सल्ला; म्हणते- १०- ११ वर्षांपूर्वी...'

Konkan Rare Flower Discovery : नष्ट होण्याच्या मार्गावर असलेली वनस्पती कोकणात! मशालीसारख्या दिसणाऱ्या दुर्मीळ 'कंदीलपुष्पा'चे वैशिष्ट्य काय?

Marathi News Live Updates : स्वातंत्र्यवीर सावरकर मानहानी प्रकरणात राहुल गांधींना मोठा दिलासा; सुप्रीम कोर्टाने कार्यवाही केली रद्द

SCROLL FOR NEXT