Satara Latest Marathi News
Satara Latest Marathi News 
सातारा

चिखलीत सरपंच-उपसरपंचपद शिवसेनेकडे; ऐनवेळी झालेल्या राजकीय घडामोडीत लागली लॉटरी

गजानन गिरी

मसूर (जि. सातारा) : चिखली ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच निवडणुकीत अल्प कालावधीत झालेल्या गुप्त घडामोडीत दोन्ही पदे शिवसेनेच्या कुलदीप क्षीरसागर यांच्या विरोधी गटाच्या हाती लागली. सरपंचपदाच्या वादातून अखेर सत्ता विरोधी गटाला प्राप्त झाली. सरपंचपदी प्रतिभा कृष्णात सावंत व उपसरपंचपदी महेश धर्मेंद्र पाटील यांची वर्णी लागली. 

माजी उपसरपंच अजितराव पाटील-चिखलीकर व पंचायत समितीचे माजी सदस्य भाऊसाहेब चव्हाण यांचे एकत्र ज्योतिर्लिंग-येडोबा-हनुमान पॅनेल ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत होते. त्यांचे नऊ पैकी सहा उमेदवार विजयी झाले. तर विरोधी शिवसेनेच्या कुलदीप क्षीरसागर यांच्या साजूबाई ग्रामविकास पॅनेलला तीन जागा मिळाल्या. तिसरे येडोबा पॅनेलही रिंगणात होते. मात्र, त्यांना एकही जागा मिळाली नाही. 

बहुमतप्राप्त विजयी ज्योतिर्लिंग-येडोबा-हनुमान पॅनेलचे भाऊसाहेब चव्हाण हे सरपंचपदासाठी इच्छुक होते. मात्र, त्यांना अजितराव पाटील गटाचा विरोध राहिला. या नाराजीतून श्री. चव्हाण यांनी विरोधी शिवसेनेच्या क्षीरसागर यांच्याशी तीन सदस्यांसह हातमिळवणी केली व त्यांना सरपंच-उपसरपंचपदही बहाल केले. नऊपैकी सहा संख्याबळ झाल्यामुळे अखेर सत्ता विरोधी गटाला प्राप्त झाली. सरपंच-उपसरपंचपदाच्या निवडीनंतर गुलालाच्या उधळणीत विजयी जल्लोष करण्यात आला. 

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथेक्लिक करा

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT