Satara Latest Marathi News 
सातारा

वीजबिलासाठी 'महावितरण'चा तगादा; पुसेगावात शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात

ऋषिकेश पवार

विसापूर (जि. सातारा) : महावितरणने शेती वीजबिल भरण्याचा तगादा लावल्याने अनेक शेतकऱ्यांवर संकट ओढावले आहे. त्यामुळे शासनाने शेती वीजबिल माफ करावे, नाही तर भविष्यात शेतकरी व सर्व पक्षीयांच्या माध्यमातून मोठे आंदोलन उभारण्याचा इशारा शेतकऱ्यांच्या वतीने महावितरणला देण्यात आला. 

याबाबतचे निवेदन पुसेगाव महावितरणचे कनिष्ठ अभियंता धनंजय मेनकुदळे यांना देण्यात आले. सद्या विविध कारणांमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असताना महावितरणने शेती वीजबिल वसुली सुरू केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले आहे. 

सरकारने याचा विचार करून शेती वीजबिले माफ करावी, अन्यथा पुसेगाव पंचक्रोशीतील शेतकरी आणि सर्व राजकीय पक्ष यांच्याकडून आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला. निवेदन देताना सेवागिरी देवस्थानचे माजी अध्यक्ष सुनीलशेठ जाधव, माजी उपसरपंच रणधीर जाधव, प्रकाश जाधव, भरत मुळे, हरी सावंत, अर्जुन मोहिते, शंतनू वाघ, सुसेन जाधव, रोहन देशमुख व शेतकरी उपस्थित होते. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anil Parab : मनसे-ठाकरे गटाची युती होणार? अनिल परब यांचं सूचक वक्तव्य; म्हणाले, 'आजचा हा मेळावा म्हणजे...'

Latest Maharashtra News Updates : दोन पक्षांचा एक पक्ष करावा; ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया

Marathi Bhasah Vijay Melava : मुंबईत राजकीय वातावरण तापलं, दादरमध्ये मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात...

Gold Rate Today: सोने-चांदीच्या किंमतीत पुन्हा उसळी! महाराष्ट्रात 24 कॅरेट सोने 1 लाखाच्या पुढे, जाणून घ्या तुमच्या शहरातील भाव

Shubhanshu Shukla : शुभांशु शुक्लांचा विद्यार्थ्यांशी अंतराळातून थेट संवाद, दिली 'ही' आश्चर्यकारक माहिती..

SCROLL FOR NEXT