सातारा

धोम कालव्याच्या गळतीमुळे 40 एकरांतील पिकांवर पाणी; खर्शी, सायगाव, महामुलकरवाडीतील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

प्रशांत गुजर

सायगाव (जि. सातारा) : धोम कालव्यातून नेहमी होत असलेली गळती, तसेच कालव्यातील पाणी ओव्हर फ्लो झाल्यामुळे जावळी तालुक्‍यात सायगाव विभागातील सुमारे 40 एकर बागायती क्षेत्रातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वेळीच लक्ष दिले नाही तर कालवा फुटण्याचा धोका आहे. 

खर्शी, सायगाव, महामुलकरवाडी या गावांच्या शिवारातून जाणाऱ्या या कालव्याची गेल्या वर्षी दुरुस्ती करून डागडुजी केली होती. पण, मोठ्या प्रमाणात गळती होऊन कालव्यात पाणी आले की आजूबाजूला पिके असणारी शेतजमीन पाण्याने तुडुंब भरली जात आहे. या शेतात दोन-दोन महिने पाणी साचून रहिल्याने शेती निकृष्ट झाली आहे. जमीन कठीण झाल्याने पेरणीही करता येत नाही. गेल्या दीड महिन्यापासून कालव्यामध्ये सोडण्यात आलेले प्रमाणापेक्षा जास्त पाणी आजूबाजूच्या रस्त्यावर येऊन कालवा फुटण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे कालव्यातून पाणी बाहेर पडून शेतीचा परिसर पाण्याने तुडुंब झाला आहे. 

या पाणी गळतीचा सर्वांत जास्त फटका हा महामुलकरवाडी व रायगावच्या शेतकऱ्यांना बसला आहे. सततच्या पाण्यामुळे शेतात गहू, हरभरा, ज्वारी व इतर बगायती पिके करताना विचार करावा लागतो. कारण, इथून कोणतेही उत्पन्न निघत नाही. संबंधित ठेकेदाराने निकृष्ट केलेल्या कामाची चौकशी करावी, अशी मागणी परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांतून होत आहे. जास्त सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे नुकसान झालेल्या शेतातील पिकांची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना द्यावी, अशीही मागणी येथील ग्रामस्थ प्रमोद काकडे, प्रवीण पवार यांनी केली आहे. गतवेळी निकृष्ट काम चालू असल्याचे निदर्शनास आले, तेव्हा ग्रामस्थांनी काम थांबविले होते. त्यावेळी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी काम पूर्ण करून गळती काढण्यात येईल, असे आश्‍वासन दिले होते. मात्र, कोणतेही काम न होता वर्षभरात पुन्हा गळती सुरू झाल्याने या कामाला जबाबदार कोण, असा प्रश्न ग्रामस्थ विचारत आहेत. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kharmas 2026: 15 मार्चपासून बदलणार ग्रहस्थिती! सूर्य मीन राशीत; का करू नयेत शुभ काम?

स्टार प्रवाहचा झी मराठीला दणका! कमळी, स्वानंदीने स्थान गमावलं; टीआरपी आपटला, पहिल्या स्थानावर कोण?

Latest Marathi News Live Update : ग्रामीण भागातही गॅससाठी रांगा, मोवाड-नरखेडमध्ये नागरिकांची सकाळपासून गर्दी

Kolhapur Headmaster Tragedy : निलंबनाचे नैराश्य मुख्याध्यापकाने थेट आंब्याच्या झाडाला घेतला गळफास, कोल्हापुरातील घटना

Gold Rate Today: सलग तिसऱ्या दिवशी सोनं स्वस्त! 20 दिवसांतील सर्वात कमी दर, 10 तोळ्यांमागे 36,500 रुपयांची घसरण; पाहा आजचा भाव

SCROLL FOR NEXT