सातारा

पुणे-बंगळूर महामार्गालगत केबल खोदाईमुळे शेतजमिनीचे नुकसान; वाहनचालकांसाठी धोकादायक स्थिती

प्रशांत गुजर

सायगाव (जि. सातारा) : पुणे-बंगळूर महामार्गावर सेवारस्त्याकडेला असणाऱ्या शेतजमिनीतून केबल खोदाई चालू आहे. त्यामधे शेतीचे नुकसान होत असून पावसाळ्याच्या आधीपासून हे काम सुरू असून अजूनही काही शेतकऱ्यांना मोबदला मिळालेला नाही. शेतीच्या नुकसानीची भरपाई कोण देणार, असा सवाल शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.
 
शासनाचे जमिनीच्या खाली केबल टाकण्याचे काम आनेवाडी ते रामनगरदरमान्य सुरू असून या कामामध्ये खासगी ठेकेदाराने अनेक शेतातून केबलसाठी जेसीबीच्या साह्याने खोदाई केली. मात्र, मोठ्या प्रमाणात चरी काढल्याने पीक वाया गेलेच, त्या ठिकाणी पाणी साठल्याने शेतीचेही नुकसान होत आहे. शासकीय कामाच्या वेळी स्थानिक शेतकऱ्यांना मोबदला दिला जातो, तसाच आताही मिळाला पाहिजे, अशी मागणी शेतकरी करू लागले आहेत. 

अनेक ठिकाणी महामार्गाच्या सेवारस्त्यावर चर काढल्याने दुचाकींचे अपघात झाले आहेत. या चरी आताही उघड्याच आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना धोक्‍याचे ठरत आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीचा पंचनामा करून त्यांना मोबदला मिळावा, यासाठी शेतकरी संघटना आक्रमक झाल्या असून लवकरच याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन नुकसान भरपाईची तसेच संबंधित ठेकेदारावर कारवाईची मागणी करणार असल्याचे सांगण्यात आले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब लवकर हवी? आता आधीच टिप देण्याचा खेळ संपला! सरकारचा Uber-Ola ला मोठा आदेश

Gelatin Blast: पुण्यातल्या कामगाराचं भयंकर कृत्य! कमरेला स्फोटकं बांधून सासरवाडीत पोहोचला, एक बटण दाबलं अन् सगळं संपलं

Onion Rate : मंचर बाजार समितीत कांद्याला दहा किलोस मिळाला ४११ रुपये उच्चांकी बाजार भाव

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, तीन जणांचा मृत्यू, काही जखमी

Pune News : प्रशासनातील वाद चव्हाट्यावर! वरिष्ठ अधिकारी दुजाभाव करतात; महापालिका आयुक्तांकडे तक्रार

SCROLL FOR NEXT