सातारा

वॉर्ड रचना, मतदार यादी चुकीची प्रसिद्ध; पंचायत समिती सदस्याचा तलाठ्यांवर गंभीर आरोप

हेमंत पवार

कऱ्हाड (जि. सातारा) : साजूर येथील गावकामगार तलाठी यांनी राजकीय हेतूने प्रेरित होऊन प्रभाग रचनेतील भौगोलिक सलगता या प्रचलित तत्त्वाच्या विरोधात 2015 च्या वॉर्ड रचनेनुसार मतदार याद्या प्रसिद्ध केल्या आहेत. संबंधित मतदार यादी आणि प्रभाग आरक्षणावर हरकत घेण्यात आली असून, त्यामध्ये नियमानुसार बदल करावा आणि चुकीचे काम करणाऱ्या तलाठ्यांवर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन तहसीलदार कार्यालयात देण्यात आल्याची माहिती माजी पंचायत समिती सदस्य विजय चव्हाण यांनी दिली.
 
श्री. चव्हाण म्हणाले, "जिल्ह्यातील 881 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी गुगल नकाशाद्वारे अंतिम प्रभाग रचना करण्यात आली आहे. अंतिम प्रभाग रचनेनुसार सातारा जिल्ह्यात मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या. जो मतदार ज्या ठिकाणी आहे, त्याच ठिकाणी त्याचे मतदार यादीत नाव आलेले नाही. मात्र, साजूर येथील तलाठी यांनी राजकीय हेतूने प्रेरित होऊन प्रभाग रचनेतील भौगोलिक सलगता या प्रचलित तत्त्वाच्या विरोधात 2015 च्या वॉर्ड रचनेनुसार मतदार याद्या प्रसिद्ध केल्या आहेत. 

एका राजकीय गटाला मदत करण्याच्या हेतूने तलाठी यांनी प्रभाग दोनमधील नावे प्रभाग एकमध्ये, तर प्रभाग तीनमधील नावे प्रभाग एकमध्ये समाविष्ट केली आहेत. अशी चुकीची मतदार यादी प्रसिद्ध करून तलाठी यांनी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. त्याबाबत तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे आक्षेप नोंदवण्यात आला आहे. संबंधित मतदार यादी आणि प्रभाग आरक्षणामध्ये नियमानुसार बदल करावा आणि चुकीचे काम करणाऱ्या तलाठ्यांवर कारवाई करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. त्याबाबतचे निवेदन श्री. चव्हाण, माजी सरपंच शीतल मूळगावकर, संदीप पाटील, संजय साटे व ग्रामस्थांनी दिले आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

पानिपताच्या लढाईनंतर या पेशव्याचं प्रेत विजयचिन्ह म्हणून अफगाणी सैनिक नेणार होते ! इतिहासातील अवघड प्रसंग

Photos : अंतराळातून दिसले पृथ्वीवर कोसळणाऱ्या प्रकाशस्तंभाचे अद्भुत दृश्य; शास्त्रज्ञही थक्क, पाहा आश्चर्यकारक फोटो..

Solapur News: 'मंगळवार, बुधवारी शाळा राहणार बंद'; वाढीव टप्पा अनुदानासाठी शिक्षक संघाचा निर्णय, नंतर मुंबईत आंदोलन

SCROLL FOR NEXT