Satara Latest Marathi News 
सातारा

मोहीम फत्ते! शिवविचार जगासमोर आणण्यासाठी रोहिडेश्वर, रायरेश्वरवर डॉक्‍टरांचे गिर्यारोहण

आयाज मुल्ला

वडूज (जि. सातारा) : येथील छावा ट्रेकर्सच्या माध्यमातून एकत्र आलेल्या डॉक्‍टरांनी रोहिडेश्वर व रायरेश्वर या दोन किल्ल्यांवर यशस्वी गिर्यारोहण केले. या मोहिमेत डॉ. सुहास घोरपडे, डॉ. महेश माने, डॉ. संतोष जाधव, डॉ. सौरभ जोशी, डॉ. प्रताप जगदाळे, डॉ. ज्ञानेश घाडगे, सचिन बनसोडे, डॉ. धनंजय काटकर, डॉ. शिवप्रसाद पोरे, डॉ. गणेश गोडसे, डॉ. विजय काटकर सहभागी झाले होते. 

शहर परिसरातील वैद्यकीय व्यावसायिक "छावा'च्या माध्यमातून गेल्या काही वर्षांपासून विविध किल्ल्यांवर गिर्यारोहण मोहीम राबवित आहेत. गिर्यारोहणाबरोबरच किल्ल्यावरील परिसरात स्वच्छता मोहीमही राबविली जाते. छावाच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांच्या गडकिल्ल्यांची सर्वांना माहिती व्हावी, तसेच त्या गडाचे महत्व समजून घेऊन संवर्धन व्हावे, हा हेतू मनात ठेऊन मोहीम फत्ते केली जात आहे.

आज सर्वत्र शिवजयंतींचा उत्साह पहायला मिळत असताना, छावाच्या माध्यमातून गडकिल्ल्यांच्या संवर्धनाची माहिती जागेसमोर आणण्याचे काम डॉक्‍टरांकडून होत असल्याने त्यांचे यानिमित्ताने कौतुक होत आहे. शिवरायांच्या गडकिल्ल्यांची महती जगासमोर यावी, या दृष्टीने डॉक्‍टरांनी घेतला पुढाकार निश्चित कौतुकास्पद तर आहेच, शिवाय अभिमानास देखील पात्र आहे.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navi Mumbai Crime : सावधान ! नवी मुंबईत भीक मागणाऱ्या टोळीचा हनी ट्रॅप, भर रस्त्यात 'असं' शोधल जातं सावज, आतापर्यंत अनेकांना लुटले

Sangli ZP Mahayuti : 'झेडपी'त सव्वा वर्षांचे चार अध्यक्ष करू, चंद्रकांतदादांची भूमिका; शिवसेना-राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिला प्रस्ताव

Gadhinglaj Panchayat : पक्षांपेक्षा गाव जिंकले! गडहिंग्लजमध्ये ‘आमचा गाव, आमचा उमेदवार’च्या लाटेत अनेकांचा दणदणीत विजय

Ajit Pawar work documentation : अजित पवार यांच्या कार्याचा समृध्द दस्तऐवज तयार होणार, ३५ वर्षातील कार्याला उलगडा होणार

Latest Marathi News Live Update : वर्धा-तुळजापूर दरम्यान जीटी एक्सप्रेसला भीषण आग

SCROLL FOR NEXT