Satara Latest Marathi News 
सातारा

हारुगडेवाडीत स्फोटकांसह पोकलेन जप्त; पाटणात तहसीलदारांची धडक कारवाई

विलास माने

मल्हारपेठ (जि. सातारा) : नवारस्ता जवळील हरगुडेवाडी गावच्या हद्दीतील सात खडी क्रशरवर अवैधरीत्या उत्खनन सुरू असल्याची माहिती पाटणचे तहसीलदार योगेश्वर टोपे यांना मिळाली. आज आणि काल सात क्रशरवर महसूल विभागाच्या पथकाने धडक कारवाई करत ते सील केले. 

सात पोकलेन मशिन व 66 स्फोटकांचे बॉक्‍स जप्त करण्यात आल्याची माहिती तहसीलदार टोपे यांनी आज दिली. हारुगडेवाडीच्या हद्दीत बुधवारी सायंकाळी महसूल व पोलिस प्रशासनाने संयुक्त ही कारवाई केली. घटनास्थळी तहसीलदार टोपे, पोलिस उपअधीक्षक अशोकराव थोरात, पाटण पोलिस निरीक्षक एन. आर. चौखंडे, वैभव सोनावणे, सीताराम कदम, संजय दूधगावकर, तलाठी निवास देशमुख, अमोल पांचाळ, महेश घोरपडे उपस्थित होते. 

तहसीलदारांनी सांगितले, की हारुगडेवाडीच्या हद्दीत विनापरवाना अवैधरीत्या उत्खनन करत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार बुधवारी दोन क्रेशरवर छापा टाकून ते सील करण्यात आले. याशिवाय त्या ठिकाणचे सात पोकलेन सील करण्यात आले आहेत. संबंधित क्रेशरची परवानगी रॉयल्टी भरण्याबाबतच्या पावत्या यांची शहानिशा करून पुढील कारवाई करण्यात येईल. दरम्यान, खाणीसाठी वापरण्यात येणाऱ्या स्फोटकाची 66 बॉम्ब मिळून आले आहेत. त्याच्याही आवश्‍यक परवान्यांची तपासणी करण्यात येणार असून, याबाबत पोलिस प्रशासनाने ही स्फोटके ताब्यात घेतली आहेत. गुरुवारी पुन्हा पाच क्रेशरवर कारवाई करण्यात आल्याचे तहसीलदार टोपे यांनी सांगितले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे राम! जैन मुनी निलेशचंद्र यांच्याकडून कौतुक; उद्धव ठाकरेंवर केली टीका, काय म्हणाले?

Commonwealth Games 2026: राष्ट्रकुल स्पर्धेसाठी भारताचे १२५ खेळाडू सज्ज; जाणून घ्या खेळाडूंची यादी अन् Live Streaming Chanel

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रीचं बॉलिवूडमध्ये पदार्पण; 'या' चित्रपटातून करणार नवी इनिंग

Latest Marathi News Live Update : नागपुरात ठाकरेंच्या शिवसेनेचं रामरक्षा आंदोलन, उद्धव ठाकरे राममंदिराच्या दिशेनं रवाना

FDA Action: तुकाराम मुंढेंची मुंबईत धाड! १० लाखांचे साबण जप्त, अन्न व औषध विभागाची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT