Satara Latest Marathi News
Satara Latest Marathi News 
सातारा

पावणेपाच कोटी विकास निधी परत जाणार?; नगरसेवकांतील वादाचा परिणाम

सचिन शिंदे

कऱ्हाड (जि. सातारा) : पाच वर्षांत शहरातील विकासकामांसाठी पालिकेच्या खात्यावर शासनाने वर्ग केलेला तब्बल चार कोटी 65 लाखांचा निधी निव्वळ पालिकेतील नगरसेवकांत समन्वय नसल्यामुळे परत जाण्याच्या मार्गावर आहे. मैदान, रस्ता आणि मल्टीपल पार्किंग कामासाठीच्या निधीचा त्यात समावेश आहे. त्यात दप्तर दिरंगाई, अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणाही तितकाच जबाबदार आहे. 

शहरातील विविध विकासकामांसाठी शासन निधी देत असते. पाच वर्षांत मोठ्या प्रमाणात पालिकेला निधी आला. मात्र, त्या निधीचे काम सुचवण्यावरून नगरसेवकांत एकमत न झाल्याने तो निधी परत जाण्याच्या मार्गावर आहे. निधी ज्या "हेड' खाली आला आहे, त्याही "हेड'वर ठराव एकही होऊ शकलेला नाही. पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री असताना 2013 मध्ये येथील बस स्थानकावर मल्टीपल पार्किंगसाठी तब्बल तीन कोटींचा निधी आला, तो निधी पालिकेने आजअखेर वापरलाच नाही. तेथील झोपडपट्टीच्या पुनर्वसनाचा प्रश्न चिघळला जाणार होता. त्यामुळे राजकीय स्वार्थापोटी पालिकेने त्या प्रश्नात लक्ष न घातल्याने तीन कोटींचा निधी पालिकेकडे आजअखेर पडून आहे. 

आता पालिका तब्बल आठ वर्षांनी त्या निधीतून मल्टीपल पार्किंगची इमारत उभी करण्यासाठी प्रयत्नशील आहे. मात्र, त्यात निधी वापरण्याची मुदत संपल्याचा तांत्रिक मुद्या आडवा येणार आहे. त्यामुळे तो निधी असूनही वापरता येणार नाही, अशीच स्थिती आहे. येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानासाठीही एक कोटी 25 लाखांचा निधी आला. मात्र, तेथील नागरिकांचा विरोध, पालिकेतील समन्वयाचा अभाव व पालिकेतील अधिकाऱ्यांनी केलेल्या दप्तर दिरंगाईमुळे तोही विषय मागे पडतो आहे. तो निधी 2017 रोजी पालिकेच्या खात्यावर वर्ग झाला. मात्र, तो प्रश्न समन्वयाने पालिकेला सोडवता आला नाही. त्यातही काहींनी राजकारण केल्याने तो निधीही तसाच पडून आहे. तोही निधी वापरण्याची मुदत संपली आहे. त्यासोबत सामाजिक न्याय विभागाने रस्त्यांसाठी दिलेला 40 लाखांचा निधीही नुकताच परत गेला आहे. त्यामुळे पालिकेतील नगरसेवकांचा वाद तो निधी परत जाण्यास कारणीभूत ठरला आहे. 

निधी परत जाण्याची नामुष्की 

पालिकांच्या उत्पन्नाचे स्त्रोत कमी होत असताना पालिकांना निधी मागण्याची वेळ येते आहे, अशा स्थितीत कऱ्हाडसारख्या 150 वर्षे पूर्ण झालेल्या पालिकेला तब्बल चार कोटी 65 लाखांचा निधी मिळालेला असतानाही तो केवळ वापरण्यावाचून परत जातो आहे. त्यामुळे पाच वर्षांत सत्ताधारी व विरोधकांनी केवळ भांडण्यात वेळ घालवला आहे, हेच खरेतर सिद्ध होत आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs DC Live Score: दिल्लीच्या अडचणी वाढल्या, स्टब्सपाठोपाठ अक्षर पटेलही बाद

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Govinda Dance: गोविंदानं डान्स करुन केला धैर्यशील मानेंचा प्रचार; व्हिडिओ पाहा

Viral Video: गिल लावत होता फिल्डिंग अन् विराटने अचानक येऊन दिला जोरात धक्का, GT vs RCB सामन्यावेळी काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : महायुती महाराष्ट्रातल्या विकासाचा अनुशेष भरुन काढेल- मोदी

SCROLL FOR NEXT