सातारा

विरोधी पक्ष संपविण्यासाठीच भाजपकडून केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर : पृथ्वीराज चव्हाण

गिरीश चव्हाण

सातारा : भाजपच्या नाकर्तेपणामुळे राज्याची सर्वच क्षेत्रात पिछाडी झाली आहे. आपले कुकर्म लपविण्यासाठी आणि जनतेची दिशाभूल करण्यासाठी भाजपाकडून यंत्रणांचा वापर करण्यात येत आहे. राज्यातील विरोधी पक्ष मोडून काढण्यासाठी, त्यांच्या नेत्यांचे खच्चीकरण करण्यासाठी भाजपकडून केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करण्यात येत आहे. ही कृती निषेधार्ह असल्याचे वक्‍तव्य करत खच्चीकरण करण्याच्या हेतूनेच शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीने कारवाई केल्याची शक्‍यता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथील पत्रकार परिषदेत व्यक्‍त केली. 

महाविकास आघाडीचे पदवीधर विधानपरिषद मतदारसंघातील उमेदवार अरुण लाड आणि शिक्षक मतदारसंघातील उमेदवार जयंत आसगावकर यांच्या प्रचारार्थ आयोजित मेळाव्यासाठी चव्हाण येथे आले होते. मेळाव्यानंतर पत्रकार परिषदेत चव्हाण म्हणाले, "महाविकास आघाडी राज्यात सत्तेत आल्यानंतरची ही पहिली निवडणूक आहे. या निवडणुकीत पहिल्यांदाच राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेसने संयुक्‍तपणे उमेदवार दिले आहेत. या दोन्ही उमेदवारांना शिवसेनेने पाठिंबा दिल्याने ते सध्या महाविकास आघाडीचे उमेदवार बनले आहेत. या उमेदवारांच्या प्रचारासाठी आम्ही आज संयुक्‍त मेळावे घेतले, तसेच अनेक शिक्षण संस्थांना भेटी दिल्या. उद्या मी आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील उर्वरित ठिकाणी संयुक्‍त दौरे करणार आहे. महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार निवडून येतील, अशी आम्हाला खात्री आहे.''

भाजपच्या साम-दाम-दंड-भेद या नीतीला भेदण्यासाठी महाविकास आघाडीचे सरकार राज्यात सत्तेत आले आहे. भाजपच्या नाकर्तेपणामुळे राज्याची सर्वच क्षेत्रात पिछेहाट झाली आहे. विरोधी पक्षांना मोडून काढण्यासाठी भाजपकडून केंद्रीय यंत्रणांचा वापर करण्यात येत आहे. मलाही काही दिवसांपूर्वी प्राप्तीकर विभागाची नोटीस आली. ज्येष्ठ नेते शरद पवार, सुप्रिया सुळे यांनाही ईडीने नोटीसा पाठविल्या होत्या. नोटिसा व केंद्रीय यंत्रणांचा वापर करत भाजप आकड्यांचा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. विरोधी नेत्यांना, विरोधी पक्षांच्या प्रमुखांना टार्गेट करत भाजपा या संस्थांचा गैरवापर करत आहे. खरंच चूक असेल तर कारवाई व्हावी, खटले भरा. यापूर्वी राज्यात अशाप्रकारे अनेक नेत्यांना टार्गेट करत तुरुंगात टाकण्यात आले. अशा पध्दतीने कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या माजी अध्यक्षांनाही तुरुगांत टाकले होते. यंत्रणांचा तपास झाला असेल तर त्यातून काय पुढे आले, हे सुध्दा पुढे आले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. पक्ष आणि व्यक्‍ती बघून केंद्राकडून अशी कारवाई होते व त्याच धर्तीवर शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर कारवाई झाल्याची शक्‍यताही चव्हाण यांनी वर्तवली. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Novak Djokovic: जोकोविच आप्पाचा विषय लय हार्डए... विम्बल्डननेच शेअर केला मराठी गाण्यावर Video; एकदा पाहाच

Modi Government Farmers Gift: मोदी सरकारची शेतकऱ्यांना मोठी भेट; कॅबिनेटमध्ये घेण्यात आले तीन महत्त्वाचे निर्णय!

Gautami Naik Exclusive: गल्ली क्रिकेट ते स्मृती मानधनाची बॅटिंग पार्टनर! किरण मोरेंनी हेरलेल्या गौतमी नाईकचा कसा राहिला प्रवास

Sun Transit Cance: १६ जुलैपासून सूर्याचा कर्क राशीत प्रवेश! वृषभ, धनु आणि मीन राशींना मिळणार विशेष लाभ, जाणून घ्या तुमचं राशी भविष्य

Uddhav Thackeray-Eknath Shinde Video: ''ते आले, त्यांनी पाहिलं अन् मग त्यांनी...'' ; उद्धव ठाकरे अन् एकनाथ शिंदे आमने-सामने!

SCROLL FOR NEXT