सातारा

वाह, क्या बात है! वाढदिनी गटविकास अधिकाऱ्यांनी बांधले केळघर परिसरात बंधारे

संदीप गाडवे

केळघर (जि. सातारा) : वाढदिवसादिवशी कोणताही बडेजावपणा न करता जलसंधारणाचे काम करून केळघर परिसरात गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी सपत्नीक श्रमदान करून ग्रामस्थ, सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या साहाय्याने एकाच दिवसात तीन वनराई बंधारे बांधले. या बंधाऱ्यामुळे परिसरातील पाणी पातळीत निश्‍चित वाढ होईल, असा विश्वास तहसीलदार राजेंद्र पोळ यांनी व्यक्त केला. 

जावळीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांच्या वाढदिवसानिमित्त केळघर येथे वनराई बंधाऱ्याच्या प्रारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सतीश बुद्धे, मयूरी बुद्धे, विस्तार अधिकारी श्री. सानप, केळघरचे सरपंच रवींद्र सल्लक, उपसरपंच बजरंग पार्टे, शिक्षक बॅंकेचे संचालक शंकर जांभळे, ग्रामसेवक आर. बी. सपकाळ, अमोल गायकवाड, एन. के. जाधव, एस. एच. निर्मल, संतोष देशमुख, अधिक जाधव, सुनील देशमुख, संदीप सावंत, संजय जुनघरे उपस्थित होते. 

श्री. बुद्धे म्हणाले, "केळघर परिसरात सर्वाधिक पाऊस पडतो. मात्र, तीव्र उताराची जमीन असल्याने पाणी वाहून जाते. त्यामुळे वाढदिवसादिवशी अनावश्‍यक खर्च टाळून जलसंधारण करण्यासाठी वनराई बंधारे उभे करण्याचा निर्णय घेतला. या उपक्रमाला सर्वांनीच साथ दिल्यामुळे केळघरला दोन बंधारे व पुनवडीत एक बंधारा असे तीन बंधारे उभे राहिले आहेत. भविष्यात महसूल विभाग, कृषी विभागाच्या सहकार्यातून केळघर परिसरात जलसंधारणाची कामे प्रभावीपणे राबवू. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Protest: पेपर लीकविरोधात 'कॉकरोच जनता पार्टी'चा एल्गार! आंदोलनासाठी परवानगी कशी मिळते? जाणून घ्या प्रक्रिया

Diesel Selling : कॅनमध्ये डिझेल विक्रीला बंदी; व्यावसायिकांसह वाहनचालकांची गैरसोय

Bhor News : माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचे निधन

Hero HF Deluxe : पेट्रोलची चिंता संपणार? नितीन गडकरींची मोठी भेट; भारतात पहिल्या Flex Fuel बाईकची एन्ट्री, किंमत 72 हजारपासून सुरू

Kolhapur Accident: कोल्हापुरात भीषण अपघात! एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT