Prithviraj Chavan
Prithviraj Chavan 
सातारा

प्रयत्नांना यश न आल्याने चर्चेतून बाहेर पडलो : आमदार चव्हाण

सचिन शिंदे/सिद्धार्थ लाटकर

कऱ्हाड (जि. सातारा) : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणुकीत (krishna sugar factory election) समविचारी पक्षांनी एकत्र यावे, यासाठी दोन महिन्यांपासून आम्ही प्रयत्न केले. मात्र, त्या प्रयत्नांना यश आलेले नाही. रविवारी रात्री अखेरची बैठक झाली; परंतु त्यातही यश न आल्याने एकत्रीकरणाच्या चर्चेतून बाहेर पडलो आहे. त्याची कल्पना संबंधितांना दिली आहे, असे माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण (prithviraj chavan) यांनी येथे जाहीर केले. (satara-news-krishna-sugar-factory-election-prithviraj-chavan-addressed-media)

सातारा व सांगली जिल्हा कार्यक्षेत्रातील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक रणधुमाळीत अविनाश मोहिते (avinash mohite) व डॉ. इंद्रजित मोहिते (indrajeet mohite) यांच्या गटाच्या एकत्रीकरणासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यात आमदार पृथ्वीराज चव्हाण, सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम (vishwajeet kadam), ऍड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. कॉंग्रेसकडून अविनाश मोहिते व डॉ. इंद्रजित मोहिते यांच्या एकत्रीकरणासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र, आज त्या प्रक्रियेतून आमदार चव्हाण यांनी बाहेर पडत असल्याचे जाहीर केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

आपण बाहेर पडल्याने एकत्रीकरण फिसकटले असे म्हणता येईल का, त्यावर आमदार चव्हाण म्हणाले, ""एकत्रीकरणाचे प्रयत्न माझ्या परीने थांबवले आहेत. त्यामुळे एकत्रीकरण फिसकटले असे कसे म्हणता येईल. दोन महिन्यांपासून कृष्णा कारखाना निवडणुकीत दोन्ही मोहिते गटात आघाडी व्हावी, म्हणून प्रयत्न केला. मात्र, तो यशस्वी झाला नाही. सभासद आता निर्णय घेतील. आजपासून चर्चेत सहभागी होणार नाही ही माझी भूमिका आहे. अविनाश मोहिते आणि डॉ. इंद्रजित मोहिते यांनाही त्याची कल्पना दिली आहे.''

आपल्या गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी डॉ. इंद्रजित मोहिते आणि अविनाश मोहिते यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे आता आपण कोणती भूमिका घेणार, या प्रश्नावर ते म्हणाले, ""यावर आताच काही भाष्य करणार नाही. सभासद योग्य तो निर्णय घेतील.'' आपण चर्चेतून बाहेर पडला म्हणजे आघाडी होणार नाही, असे म्हणावे का, त्या प्रश्नावरही आघाडी होणार नाही, असे मी सांगू शकत नाही. संबंधित त्याचा निर्णय घेऊ शकतात, याचा आमदार चव्हाण यांनी पुनरुच्चार केला.

Krishna Factory

मी सहभागी होणार नाही

कारखान्यात कॉंग्रेस पक्षाची भूमिका काय राहणार, त्या प्रश्नावर आमदार चव्हाण म्हणाले, ""ही निवडणूक आर्थिक संस्था, सहकारी संस्थेची निवडणूक आहे. त्यामुळे त्याचा निर्णय त्या- त्या पातळीवर होईल. मात्र, समविचारी लोकांनी एकत्र यावे, यासाठी प्रयत्न केले. त्यात अपेक्षित यश न आल्याने आजच्या तारखेपासून त्या विषयात मी सहभागी होणार नाही.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Update : १० जूनला भाजपचा मुख्यमंत्री शपथ घेईल- पंतप्रधान नरेंद्र मोदी

World Athletics Relays : भारतीय महिला अन् पुरुष संघाची रिलेमध्ये दमदार कामगिरी, आता ऑलिम्पिक पदकासाठी पॅरिसमध्ये धावणार

Google Chrome Errors: गुगल क्रोम युजर्सना सरकारचा इशारा, नुकसान टाळण्यासाठी लगेचच करा 'हे' बदल

Sharad Pawar: "मेहनत घेण्याची क्षमता आणि चिकाटी..."; शरद पवारांसाठी हेमंत ढोमेचं ट्वीट

California Bridge : कुठेच न पोहोचणारा 11 बिलियन डॉलरचा पूल! अमेरिकेतला ब्रिज झाला चेष्टेचा विषय

SCROLL FOR NEXT