सातारा

कऱ्हाड तालुक्यातील वडगावात वनविभागाच्या खाणीत मृतावस्थेत बिबट्या आढळल्याने घबराट

संतोष चव्हाण

उंब्रज (जि. सातारा) : भागातील वडगाव येथील वनविभागाच्या खाणीत काल रात्री ९ वाजण्याच्या सुमारास बिबट्याचा मृतदेह आढळला. तो पूर्ण कुजलेल्या अवस्थेत असून बिबट्याचा मृत्यू नैसर्गिकरित्या झाला आहे. किमान महिन्यांपूर्वी त्या बिबट्याचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी,  वडगाव (उंब्रज) गावाच्या हद्दीतील एका खाणीपासून आतमध्ये वनविभागाच्या हद्दीत बिबट्याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांना मिळाली. यावेळी त्यांनी ती माहिती वनविभागाला कळवली. त्यानंतर वनविभागाचे वनक्षेत्रपाल अर्जुन गमरे, वनरक्षक दीपाली अवघडे, राहुल रणदिवे, रमेश जाधवर, पर्यावरण अभ्यासक रोहन भाटे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

दरम्यान, वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी मृत बिबट्याची पाहणी केली. त्यावेळी बिबट्याचा मृत्यू नैसर्गिकरित्या न्यूमोनियाने झाला असल्याची शक्यता वर्तवली आहे. रात्री उशिरा उंब्रज येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विजय भोसले घटनास्थळी दाखल झाले असून जागीच शवविच्छेदन करण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाचे वनक्षेत्रपाल अर्जुन गमरे यांनी दिली.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLA Bachchu Kadu: अन्यथा भाजपचा बॅलेट कोरा करणार: आमदार बच्चू कडू; शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याच्या आश्वासनाच काय झालं

Local Megablock: तीन दिवस विशेष ब्लॉक! लाेकल, मेल-एक्स्प्रेसवर परिणाम, वेळापत्रकात बदल; पाहा कधी आणि कोणत्या मार्गावर?

Latest Marathi News Updates : अपघातामुळे हार्बर रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत

'अरे ही तर म्हातारी...' शाहरुखच्या होणाऱ्या सूनेला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, आर्यनची गर्लफ्रेंड आहे तरी कोण?, व्हिडिओ व्हायरल

उमेदवारी नको पण हकालपट्टी टाळा, मुंबईला तिकिट मागायला गेलेल्या ४ भाजप पदाधिकाऱ्यांची फजिती; बारमध्ये काय घडलं?

SCROLL FOR NEXT