Satara Latest Marathi News 
सातारा

आगामी निवडणुकांत राष्ट्रवादीचा टक्का वाढवा; आमदार पाटलांचे कार्यकर्त्यांना आवाहन

विलास साळुंखे

भुईंज (जि. सातारा) : पाचवडच्या सरपंच, उपसरपंचांसह ग्रामस्थांनी मागणी करून पाठपुरावा केलेल्या विकासाकामांचे भूमिपूजन आज या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत होत असून, गावातील जनतेच्या अपेक्षा पूर्ण करत आहे. भविष्यातील निवडणुकांत पाचवडमधून राष्ट्रवादीचे मतदान वाढले पाहिजे, असे प्रतिपादन आमदार मकरंद पाटील यांनी केले. 

पाचवड (ता. वाई) येथे आमदार मकरंद पाटील यांच्या विशेष प्रयत्नांतून व ग्रामपंचायत, ग्रामस्थांच्या संकल्पनेतून एक कोटी 93 लाख 66 हजार रुपयांच्या घनकचरा व्यवस्थापन, राष्ट्रीय पेयजल योजना, सिंगल फेज योजना, पथदिवे, रस्ता खडीकरण, घंटागाडी लोकार्पण, तसेच रस्ता डांबरीकरण अशा विविध विकासकामांचा कार्यारंभ श्री. पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. त्याप्रसंगी श्री. पाटील बोलत होते. या वेळी सातारा जिल्हा परिषदेचे सदस्य प्रकाश चव्हाण, वाई तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष प्रमोद शिंदे, वाई पंचायत समितीच्या सभापती मनीषा चव्हाण, वाई शेती उपन्न बाजार समितीच्या संचालक शारदा गायकवाड, पाचवड विकास सेवा सोसायटीचे अध्यक्ष पांडुरंग गायकवाड, नवलाई पतसंस्थेचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड, पाचवडच्या सरपंच अर्चना पिसापुरे, उपसरपंच अजित शेवाळे आदी उपस्थित होते. 

श्री. पाटील म्हणाले, ""महिना दोन महिन्यांच्या कालावधीत थोडासा कमी झाल्याचे जाणवत असताना कोरोना पुन्हा वाढतो आहे. याला लोकांचा बेजबाबदारपणा पूर्णतः कारणीभूत आहे. लोकांनी शासन करत असलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन त्याप्रमाणे वागले पाहिजे, तरच कोरोनावर मात करता येईल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम टाळत होतो, तरीही गावातील सरपंच व उपसरपंच अजित शेवाळे यांच्या धडपडीमुळे मला हा कार्यक्रम टाळता आला नाही. अजितची धडपड आणि सर्व सदस्यांचे त्याला असणारे पाठबळ यामुळे ही कामे होत गेली. घनकचऱ्यासाठी दोन एकर जागा मिळविणे ही काही सोपी गोष्ट नव्हती, तरीही अजितच्या पाठपुराव्यामुळे ते शक्‍य झाले आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पाचवड गावात विकासगंगा आणली असून, ती येतच रहाणार आहे.'' प्रमोद शिंदे, मनीषा चव्हाण, अर्चना विसापुरे यांनी मनोगत व्यक्त केले. अजित शेवाळे यांनी प्रास्ताविक केले. 

नको तिथे वेळ घालवू नका! 

पाचवडच्या सरपंच अर्चना विसापुरे व त्यांचे पती नितीन विसापुरे हे भाजपत असून, माजी आमदार मदन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहेत. त्यांना आमदार पाटील यांनी राष्ट्रवादीत येण्याचे आवाहन करू नको, तेथे वेळ घालवू या कंपूत सामील व्हा, असे आवाहन केले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT