satara sakal
सातारा

Satara News : कऱ्हाडला उंच बॅनरवर चढून मराठा युवकांचे आंदोलन; सामूहिक आत्महत्या करण्याचा इशारा

मराठा समाजाला आरक्षण मिळावे आणि मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेल्या आंदोलनाला

- हेमंत पवार

कऱ्हाड - मराठा क्रांती मोर्चा संपल्यानंतर तीन युवकांनी दत्त चौकातील उंचावरील बॅनरवर चढून घोषणा देत खाली उतरण्यास नकार दिला. त्यावेळी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेवुन हस्तक्षेप करत त्यांना खाली उतरल्याने पुढील अनर्थ टळला. दरम्यान मनोज जरांगे-पाटील यांना काही बरे-वाईट झाले तर मराठा समाजातील युवक सामुहीक आत्महत्या करतील. त्यास सरकार जबाबदार राहिल असा इशारा आंदोलनकर्त्यांनी यावेळी दिला.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे आणि मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज येथे मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मोर्चा संपल्यानंतर भुषण जगताप, गणेश पवार आणि विक्रम गायकवाड या मराठा समाजाच्या तीन युवकांनी येथील दत्त चौकातील उंचावरील बॅनरवर चढून घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांना मराठा समाजाच्या समन्वयकांनी आणि पोलिसांनी खाली उतरण्याचे आवाहन केले. मात्र त्यांनी खाली उतरण्यास नकार दिला.

त्यानंतर तातडीने मराठा समाजाचे काही समन्वयक आणि पोलिस उपाधिक्षक अमोल ठाकुर, पोलिस उपनिरीक्षक राजु डांगे व काही पोलिस कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी हस्तक्षेप करत संबंधित तिघांना खाली उतरले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. भाजप, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेनेचे नेते फक्त मराठा समाजाला आरक्षणासाठी झुलवत ठेवत आहे असा आरोप करुन आंदोलनकर्ते भुषण जगताप म्हणाले,

सर्वच पक्ष आम्ही आरक्षण देवु असे म्हणतात, मात्र कोणीही ते देत नाही. त्यासाठी जरांगे पाटील सहा दिवसपासुन उपोषण करत आहेत. त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यांचे काही बरेवाटईट झाले तर आम्ही मराठा समाजातील युवक सामुहीक आत्महत्या करु. त्याला सरकारच जबाबदार राहिल असा इशारा दिला.

यंत्रणेची उडाली धावपळ

मराठा समाजाचा मोर्चा शांततेत पार पडला. त्यानंतर आंदोलन होईल याची कोणालाच कल्पना नव्हती. त्यामुळे सर्वजण शांततेत घरी जाण्याच्या मार्गावर होते. मात्र अचानक दत्त चौकातील उंचावरील बॅनरवर तीन युवक चढल्याने पोलिसांसह यंत्रणेची धावपळ उडाली. पोलिसांनी वेळीच धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Crime: नागपूर शहरातील ऑनलाइन बेटिंगची लिंक दुबईपर्यंत; दिल्ली- राजस्थानात मास्टरमाईंड, ५०० रुपयांचा फ्रॉड आता कोट्यवधीपर्यंत!

Breaking News Live Update: धाराशिव मधील विमानतळावर शिवसैनिक व पोलिसात बाचाबाची

Vastu Tips : किचनमध्ये नक्की ठेवा 'या' 5 वस्तू; घरी होणार नाही पैशाची कमी, कुटुंबातल्या आरोग्याच्या समस्या होतील दूर, नोकरी-धंद्यात यश

Vidarbha Premier League 2026: विदर्भ प्रीमियर लीगचा थरार १ जूनपासून; नवे नाव, अधिकृत लोगो, शुभंकरचे थाटात अनावरण, यंदा २७ सामने

8th Pay Commission ची पुणे अन् दिल्लीत 'या' तारखेला महत्त्वाची बैठक, सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढ अन् पेन्शनबाबत होणार मोठा निर्णय?

SCROLL FOR NEXT