satara
satara sakal
सातारा

Satara News : सातबारात प्रचंड चुका! तब्बल दहा हजार शेतकरी दुरुस्तीच्या रांगेत

उमेश बांबरे

सातारा - आधुनिक सुधारणांची कास धरत शेतकऱ्यांच्या सोईसाठी ऑनलाइन सातबारा सुरू झाला; परंतु ही सोयच जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. सातबारा आॅनलाइन करण्याच्या या प्रक्रियेदरम्यान अनेक चुका झाल्या असून, जिल्ह्यातील तब्बल दहा हजार शेतकऱ्यांना आपला सातबारा दुरुस्ती करून घेण्यासाठी तलाठी ते तहसीलदार कार्यालयांचे उंबरे झिजवावे लागत आहेत. त्यातून शेतकऱ्यांची मानसिक व आर्थिक पिळवणूक होत आहे.

ही चूक दुरुस्तीची प्रक्रिया क्लिस्ट आहे. यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याबरोबरच जमिनीचे जुने फेरफार मिळवणे, खरेदीपत्रांची नक्कल सादर करणे, जुना हस्तलिखित सातबारा उतारा मिळवणे, या बाबी कराव्या लागतात. या सर्व बाबी मिळवताना शेतकऱ्याला आपला खिसाही ढिला करावा लागत आहे. पावला-पावलाला पैसे खर्च करावे लागत आहेत. चूक महसूलची आणि भुर्दंड जमीन मालक शेतकऱ्याला, अशी अवस्था सध्या झाली आहे. सध्या जिल्ह्यातील अकरा तहसील कार्यालयांत सातबारा उताऱ्यातील दुरुस्तीचे दहा हजार अर्ज प्रलंबित आहेत.पान ८ वर

या झाल्‍या गंभीर चुका

नावांतील, इतर हक्क, आणेवारी चुकीची लागणे

नावे वगळली जाणे

नवीन नावांचा समावेश होणे

एकाची जमीन दुसऱ्याच्या नावावर लागणे

आणेवारी बदलणे, गट नंबर चुकणे

क्षेत्राचा मेळ न बसणे

बोजा कमी-जास्त होणे

असा बसतोय फटका

चुकीच्या नोंदींमुळे जमीन खरेदी-विक्रीत अडचण

कर्ज मिळण्यात होतो त्रास

सोसायटीच्या कर्जाची मर्यादा कमी होते

पुरेसे पीक कर्ज मिळत नाही

अन्य पर्यायातून मिळवावे लागतेय कर्ज

चुकांचे दुष्परिणाम

सोसायटीच्या कर्जाची मर्यादा कमी झाल्याने पुरेसे पीक कर्ज मिळत नाही

शेतजमिनीवर कर्ज घेताना कर्जाची रक्कम कमी होणेळवावे लागतेय कर्ज

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT